21.1 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeमहाराष्ट्रसंजय राऊतांच्या घरी पैसे सापडले, माझ्या घरी नाही - मुख्यमंत्री संतापले

संजय राऊतांच्या घरी पैसे सापडले, माझ्या घरी नाही – मुख्यमंत्री संतापले

एकमत ऑनलाईन

पुणे : संजय राऊतांच्या घरी पैसे सापडले होते त्यातील एका बंडलावर मुख्यमंत्र्याचे नाव होते.त्यावर एकनाथ शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. संजय राऊतांच्या घरी पैसे सापडले ते माझ्याघरी सापडले नाहीत. मी त्यांना पैसे पाठवले नाही. त्यामुळे त्यावर माझे नाव त्यांनीच लिहिले असावे, असे विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. ते पुण्यातील विभागीय आयुक्त कार्यालयातील आढावा बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुणे दौ-यावर आहेत. त्यांनी पुणे जिल्ह्यातील विविध विकास काम आणि पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. आजादी का अमृत महोत्सव हर घर तिरंग्याचे नियोजन केले आहे.अनेक योजनांचा फायदा झाला पाहिजे. केंद्राकडून राज्यांच्या योजनांना मदत मिळेल. या सगळ्यांना गती देण्याचं काम झाले पाहिजे याबाबत चर्चा केली.

मुख्यमंत्र्यांचे शेतक-यांकडे लक्ष नाही, पूर परिस्थितीककडे लक्ष नाही ते सत्कार स्विकारण्यात व्यस्त आहे असे विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले होते. त्यावर एकनाथ शिंदे यांनी पवारांना टोला लगावला आहे. नागरीकांचं कोणतीही जीवित हानी होऊ नये. यासाठी सगळ्या यंत्रणा तैनात ठेवली होती. पूर परिस्थितीत गडचिरोलीचा दौरा केला. हेलिकॉफ्टरने जाणार होतो मात्र वातावरण नीट नसल्याने हेलिकॉफ्टरने जाऊ शकलो नाही मात्र हेलिकॉफ्टर नाही म्हणून आम्ही थांबलो नाही. रोडने प्रवास करुन गेलो. त्या परिसराती पाहणी केली. योग्य पद्धतीने त्यांची मदत करु, असे देखील ते म्हणाले.

पुण्यातील पूरपरिस्थितीचा आढावा
पूरात झालेलं शेती, पिकांचं नुकसान, जीवित हानी याबाबत योग्य पंचनामे करुन निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी सांगितले.

माझे नाव नको असे सांगितले होते
पुण्यातील हडपसरमध्ये उद्यानाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने देणार होते. मात्र काही संस्थांकडून यावर आक्षेप नोंदवल्या गेला. त्यानंतर नवा वाद झाला. उद्घाटनाचा सोहळा रद्द करावा लागला. मी माझे नाव देवू नको आधीच सांगितले होते. त्या व्यतिरिक्त आनंद दिघेंचे नाव द्या, असे सांगितले होते. मात्र कार्यकर्त्याने माझे ऐकले नाही असे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

मंत्रिमंडळ विस्तार कधी?
लवकरच मंत्रिमंडळ विस्तार करणार आहोत. मात्र सरकार सगळ्या गोष्टींचा विचार करुन योग्य निर्णय घेणार आहे. शेतकरी, पेट्रोल-डिझेल यांच्या किंमती कमी केल्या. त्यामुळे सरकार चांगलंच काम करत आहे, असेही ते म्हणाले.

एमआयडीसी रद्द का केली?
आमदारांच्या दबाबामुळे सातारा जिल्ह्यातील एमआयडीसी रद्द केली नाही. त्याचा माझ्यावर कोणताही दबाव नाही आहे. त्या परिसराची आणि जागेची तपासणी केली त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. छत्रपती संभाजी महाराजांच्या वळू-तुळापूरच्या समाधीस्थळाचा आराखडा स्थगित करण्यात आला होता, असं सांगण्यात आलं होतं मात्र त्या ठिकाणच्या विकासकामाचा आराखड्याला स्थगित दिली नाही आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या