25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रावर आता पैशांचा पाऊस पडेल; शिंदेंच्या दिल्लीवारीवर सेनेचा टोला

महाराष्ट्रावर आता पैशांचा पाऊस पडेल; शिंदेंच्या दिल्लीवारीवर सेनेचा टोला

एकमत ऑनलाईन

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी वेगळा मार्ग त्यांच्या मर्जीने स्वीकारला असला तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे कोणी कौतुक करीत असेल तर ते स्वीकारणारे ‘मन’ आमचे आहे. महाराष्ट्रावर आता पैशांचा पाऊस पडेल, हात पुढे केला की हवे ते मिळेल. कारण महाराष्ट्रात दिल्लीच्या मनाप्रमाणे घडले आहे. शिंदे व त्यांच्या लोकांनी दिल्लीस हवे तसे करून दिले आहे, अशी खोचक टीकाही करण्यात आली.

शिवसेनेकडून सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर हल्लाबोल करण्यात येत आहे. शिवसेनेकडून खासदार संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दररोज हल्लाबोल करत आहेत. आज पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौ-यावर शिवसेनेने टीका केली आहे.

मुंबईचे महत्त्व कमी करण्याची एकही संधी दिल्लीकरांकडून सोडली जात नाही. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आहेत. त्यांनी महाराष्ट्राची भूमिका भक्कमपणे मांडावी अशी आशा शिवसेनेने व्यक्त केली आहे. आपल्या गटासाठी मंत्रिपदे अधिक मिळविण्यासाठी हा दौरा असेल तर काही बोलायला नको. मात्र इतर बाबतीत भाजपच्या ‘हो’ला ‘हो’ केलेत तर मुंबई हातची जाईल, तसेच महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचे भाजपचे मनसुबे तडीस जातील. तेव्हा शिंदे गट काय करणार, असा सवालही ‘सामना’तून उपस्थित करण्यात आला.

शिवसेनेत फूट पाडून व मराठी माणसांची ऐक्याची वज्रमूठ फोडून शिंदे हे दिल्लीस गेले आहेत. शिंदे व त्यांच्या लोकांनी जे केले, त्यामुळे मुंबईवरील मराठी माणसांचा पगडा कमी होईल व दिल्लीला नेमके तेच हवे आहे. मात्र जाताना त्यांनी महाराष्ट्रहिताचा कोणता कार्यक्रम पंतप्रधानांच्या समोर ठेवण्यासाठी नेला ते स्पष्ट केले पाहिजे, अशी मागणी ‘सामना’तून करण्यात आली. इकडे महाराष्ट्रात शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसल्याचे समजताच तिकडे बेळगावसह संपूर्ण सीमा भागात मराठी जनांत आक्रोश सुरू झाल्याचेही म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या