27 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeराष्ट्रीयकेरळमध्ये मंकिपॉक्स रुग्णाचा मृत्यू

केरळमध्ये मंकिपॉक्स रुग्णाचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

कोच्ची : केरळमध्ये मंकीपॉक्सच्या लक्षणे असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे समोर आले असून यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर राज्य सरकारने या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत असे राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले. लागण झालेली व्यक्ती २२ जुलै रोजी युएईमधून भारतात दाखल झाली होती. मंकीपॉक्स हा जीवघेणा आजार नसून संबंधित व्यक्तीवर उपचारात झालेल्या दिरंगाईची चौकशी केली जाईल.

जॉर्ज म्हणाल्या की, मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मंकीपॉक्स टेस्टचा अहवाल यूएईमध्ये पॉझिटिव्ह आला होता. ही व्यक्ती २२ जुलै रोजी भारतात आल्यानंतर त्याची मंकीपॉक्सची चाचणी करण्यात आली. त्यात त्याचा आहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला २७ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिकचा थकवा आणि एन्सेफलायटीसमुळे त्यांच्यावर त्रिशूरमध्ये उपचार सुरू होते. या मृत्यूबाबत आरोग्य विभागाने पुन्नूर येथे बैठकही बोलावण्यात आली असून मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यकींची संपर्क यादी तयार करण्यात आली आहे.

तसेच संपर्कात आलेल्या सर्वांना आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. आतापर्यंत भारतात मंकीपॉक्सचे पाच रुग्ण आढळून आले आहेत, त्यापैकी तीन केसेस केरळमधील तर, एक दिल्ली आणि एक आंध्र प्रदेशातील गुंटूरचा आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये दिवसेंदिवस वाढणा-या मंकीपॉक्सच्या रूग्णवाढीनंतर केंद्र सरकारने सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, दुसरीकडे निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल यांनी या आजाराला घाबरण्याची गरज नाही, परंतु देश आणि नागरिकांनी जागृत असणे महत्त्वाचे असून, ज्यांना या आजारीची लक्षणे दिसत असतील त्यांनी वेळीच टेस्ट करणे आवश्यक आहे.

डब्ल्यूएचओकडून आरोग्य आणीबाणी जाहीर
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार(डब्ल्यूएचओ) आतापर्यंत या आजाराचे ७८ देशांमध्ये १८,००० हून अधिक प्रकरणे नोंदविली गेली आहेत. वाढत्या रूग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर डब्ल्यूएचओकडून जागतिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली आहे. तसेच न्यूयॉर्कमध्येदेखील आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. कोरोनानंतर नव्याने आलेल्या मंकीपॉक्स आजारामुळे येथे १.५० लाखांहून अधिक नागरिकांना संसर्ग होण्याचा धोका आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांच्या आकडेवारीनुसार न्यूयॉर्कमध्ये शुक्रवारपर्यंत मंकीपॉक्सची १,३४५ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यात कॅलिफोर्निया ७९९ रूग्णांसह दुस-या स्थानावर असल्याचे न्यूयॉर्कचे महापौर एरिक अ‍ॅडम्स आणि आरोग्य आयुक्त अश्विन वासन यांनी सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या