19.2 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeएक जूनला मान्सूनचे केरळात दमदार आगमन

एक जूनला मान्सूनचे केरळात दमदार आगमन

एकमत ऑनलाईन

कोची : वृत्तसंस्था
यंदा १ जूनला नैऋत्य मान्सून केरळमध्ये पोहचण्यासाठी परिस्थिती अनुकूल असल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार ३१ मे रोजी दक्षिण-पूर्वेकडील आणि पूर्वेकडील मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. परिणामी मान्सून लवकर केरळात दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

दक्षिण-पश्चिम मान्सूनने गुरुवारी मालदीव कोमोरिन भागातील काही भाग, दक्षिण बंगालच्या उपसागरातील काही भाग, अंदमान सागर आणि अंदमान व निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये प्रवेश केला. पुढील ४८ तासात मालदीव-कोमोरिन क्षेत्राच्या आणखी काही भागातून मान्सून पुढे जाण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्रावर चक्रीवादळचा प्रभाव आहे, पश्चिम मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. याचा प्रभाव ट्रोफोस्फेरिक स्तरापर्यंत विस्तारित आहे. पुढच्या काही तासांमध्ये मान्सून वेगाने पुढे येणार असल्याचा अंदाज आहे.

Read More  देशात चोवीस तासांत ६,५६६ नवे रुग्ण, १९४ जणांचा मृत्यू

यंदा मान्यून वेळेत

देशभरातल्या शेतकºयांसह आपण सारेच ज्याची वाट बघच असतो तो पावसाळा जवळ आला आहे़ नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून एक जूनला केरळमधून भारतात प्रवेश करतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून केरळात धडकण्याची सरासरी तारीख एक जून आहे, त्यात चार दिवस कमी किंवा जास्त होत असतात. १५ मे ला भारतात मान्सूनचे आगमन थोडेसे उशीराने होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. मात्र, आता मान्सून वेळेत येणार असल्याचे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे.

मान्सून आगमनाचा इतिहास
गेल्या वर्षी हवामान विभागाने ६ जूनला नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होईल असा अंदाज दिला होता, प्रत्यक्षात ८ जून रोजी झाले होते
२०१८ साली हवामान खात्याचा अंदाज होता़ २९ मे प्रत्यक्षात २९ मे रोजीच मान्सून दाखल झाला होता.
२०१७ साली हवामान खात्याने सांगितले होते़ ३० मे तर ३० तारखेलाच आला होता मान्सून आला होता.
२०१६ साली हवामान खात्याने सांगितले होते़ ६ जून प्रत्यक्षात ८ जून तर
२०१५ साली हवामान खात्याने ३० मे तारीख सांगितली होती़ प्रत्यक्षात ५ जून रोजी आला होता मान्सून.
मान्सून आगमनाच्या तारखेचा अंदाज सांगणे भारतीय हवामान विभागाने २००५ पासून सुरु केले आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या