पुणे (प्रतिनिधी): बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र मान्सूनच्या वाटचालीस पुरक ठरण्याचे संकेत आहेत. त्यामुळे येत्या मंगळवार पर्यंत म्हणजे नऊ जून पर्यंत मान्सून कोकणात दाखल होण्याची शक्यता आहे.
रविवारी मान्सूनने तामिळनाडूचा बहुतांशी भाग, अंतर्गत कर्नाटकचा काही भाग आणि आंध्र प्रदेशाच्या रायलसिमा भागात प्रगती केल्याचे हवामान विभागान जाहीर केले. गुरूवारी पश्चिम किनारपट्टीवर वाटचाल करत संपुर्ण केरळ व्यापला त्यानंतर कर्नाटक राज्याची संपुर्ण किनारपट्टी व्यापून मान्सूनचे वारे गोव्याच्या उंबरठ्यावर दाखल झाले आहेत. यातच बंगालच्या उपसागरात मंगळवार पर्यत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहते हे कमी दाब क्षेत्र मान्सूनसाठी पोषक ठरून वेगाने वाटचाल होण्याची शक्यता आहे. कोकणात दाखल होताच महाराष्ट्राच्या इतर भागातही मान्सून वेगाने प्रगती करण्याची शक्यता आहे.
दरम्यान बंगालच्या उपसागरात जे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे. त्याचे वादळात रूपांतर होऊ शकते असा अंदाज आहे त्यामुळे पुढे तीन ते चार दिवस हवामान खात्यांची नजर बंगालच्या उपसागरात होणाऱ्या बदलांवर राहणार आहे. त्यानूसार अर्लट सुद्धा जारी करण्यात येईल वादळाचा पहिला टप्पा म्हणजे कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे परंतू प्रत्येक कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर वादळात होत नाही. त्यामुळे सध्या तरी वाट पाहणे हाच एक पर्याय आहे. वादळ निर्माण झाले नाही तरी ओडिशा किनारपट्टीच्या लगत दहा जूनच्या आसपास मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Read More विनाकारण भीती दाखवून अॅडमिट करणाऱ्या रुग्णालयाला दणका