24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयअंदमानात धडकणार मान्सून!

अंदमानात धडकणार मान्सून!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात नैऋत्य मान्सूनचा पाऊस दाखल होईल, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून देण्यात आली. अलीकडेच यंदा मान्सूनचा पाऊस नेहमीपेक्षा एक आठवडा आधी बेटांवर दाखल होईल, अशी शक्यता आयएमडीकडून वर्तवण्यात आली होती. त्यानुसार आज भारतीय समुद्रातील काही भागांत मान्सून धडकणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

येत्या काही दिवसांत संबंधित प्रदेशांत नैऋत्य मोसमी वारे अधिक बळकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील पाच दिवस दक्षिण अंदमान समुद्रासह निकोबार बेटे आणि दक्षिणपूर्व बंगालच्या उपसागरात विजांच्या गडगडाटासह वादळी वा-याच्या साथीने अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तासांत याठिकाणी ६४.५ मिमी ते ११५.४ मिमी पाऊस होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे हवामान विभागाने केरळ, तामिळनाडू, माहे आणि लक्षद्वीप परिसरालादेखील पुढील २४ तासांसाठी सतर्कतेचा तीव्र इशारा जारी केला आहे. संबंधित ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येथे ६४.४ मिमी ते २०४.४ मिमी पाऊस कोसळण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या