26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeमहाराष्ट्रदोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

दोन ते तीन दिवसांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

एकमत ऑनलाईन

पुणे : भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होईल.

केरळमध्ये आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. काल मान्सून श्रीलंकेत दाखल झाला असून केरळमध्ये आज मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे.

केरळमध्ये ५० टक्क्यांहून अधिक स्टेशन्सवर पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार १ जूनच्या आधी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची वाटचाल धीम्या गतीने राहणार आहे. परंतु, जून-जुलै महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. वेळेच्या सहा दिवस आधीच मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. दरम्यान, आज संध्याकाळपर्यंत केरळमध्ये मान्सून कधी दाखल होईल याची तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे.

विदर्भात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस
विदर्भात देखील उष्णतेच्या लाटेमुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागला आहे. परंतु, विदर्भात देखील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या