नवी दिल्ली- श्रीराम मंदिरासाठी देशभरातून दान देण्यासाठी लोक पुढे येत आहेत. अनेक दानशूर व्यक्ती पुढे येत असून याकामासाठी दान देऊ लागले आहेत. राम मंदिराच्या बांधकामासाठी प्रसिद्ध कथावाचक मोरारी बापू यांनी पाच कोटी रुपयांची देणगी देण्याची घोषणा केली आहे. भावनगरमधील तलगाजरडामध्ये डिजिटलच्या माध्यमातून मोरारी बापू यांनी रामकथा वाचन केले. यावेळी व्यासपीठावरुन राम मंदिर बांधण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याची घोषणा केली.
श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे.येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. हिंदू पुराणकथांनुसार ५ विटा ५ ग्रहांचे प्रतीक असल्याचे मानले जाते. विश्व हिंदू परिषदेने (VHP) प्रस्तावित केलेल्या आधारे मंदिराची रचना आणि वास्तुकला ठेवण्यात आले आहे. मंदिराची रचना विष्णू मंदिराच्या शहर शैलीची असेल. तर मंदिर गाभारा अष्टकोनी असेल.
अयोध्यामधील पुजाऱ्यांनी तीन दिवसीय वैदिक अनुष्ठानांसह तीन ऑगस्टला रामजन्मभूमी साइटवर सोहळ्यासाठी मोठा आराखडा तयार केला आहे. दि. ४ ऑगस्टला रामाचार्य पूजा होईल. यानंतर ५ ऑगस्ट रोजी रात्री १२:१५ वाजण्याच्या भूमिपूजन आयोजित केले जाईल. मोदी यांची अयोध्या आणि राम मंदिर परिसराची ही पहिली भेट असेल. ५ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट स्थापण्याची घोषणा केली होती.
Read More देशातील पहिलीच घटना : गर्भात असतानाच बाळाला कोरोनाची लागण