21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeराष्ट्रीयभाजीविक्रेते, दुकान कामगारांपासून अधिक धोका!

भाजीविक्रेते, दुकान कामगारांपासून अधिक धोका!

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त होत असतानाच किराणा दुकानांवर काम करणारे आणि रस्त्यांवरील विक्रेत्यांपासून कोरोना पसरण्याचा धोका सर्वाधिक असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. अशा लोकांमुळे मोठ्या प्रमाणावर लोक संक्रमित होऊ शकतात. त्यामुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या लोकांची वेगाने तपासणी करावी, अशा सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिल्या आहेत. यासोबतच मृत्यू दर कमी करणे हे सरकारचे लक्ष्य असून, याबाबतही राज्यांनी विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश भूषण यांनी दिला.

किराणा दुकानावर काम करणारे किंवा भाजीविक्रेत्यांशी दररोज अनेक लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे अशा लोकांकडून कोरोना पसरण्याचा सर्वाधिक धोका होऊ शकतो, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवांना पत्र पाठवले असून, अशा लोकांची तपासणी तात्काळ करून घेणे गरजेचे असल्याचे त्यात नमूद केले आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक लक्ष जीव वाचविण्यावर असायला हवे, असेही ते म्हणाले.

ऑक्सीजनची व्यवस्था आणि क्विक रिस्पॉन्स मेकॅनिझमच्या रुग्णवाहिका ट्रान्सपोर्ट सिस्टमचीही आवश्यकता आहे. अनेक राज्यांत रुग्णांना रुग्णवाहिका मिळण्यात अडचणी येतात. आता नव्या भागांत रुग्ण समोर येत आहेत. यावर भूषण यांनी जिल्ह्यात रुग्णांचे क्लस्टर्स अथवा मोठा उद्रेक होऊ शकतो. अशा प्रकारचा उद्रेक थांबविणे आवश्यक आहे, असे विशेषत: नव्या लोकेशनच्या ठिकाणी अधिक काळजी घ्यायला हवी, असेही पत्रात नमूद करण्यात आले.

कोरोनाबाधित ठिकाणांवर अधिक लक्ष ठेवायला हवे
बंद असलेल्या कामाच्या ठिकाणी इंडस्ट्रीयल क्लस्टर्स असू शकतात. जेथे अधिकांश कोरोनाबाधित असलेल्या ठिकाणांवरून लोक येत आहेत. झोपडपट्टया, जेल, वृद्धाश्रमातदेखील हॉटस्पॉट असू शकतात. तसेच किराणा दुकानवाले, भाजी विक्रेते आणि इतर काही विक्रेते संक्रमणास कारणीभूत ठरू शकतात, असे भाग आणि अशा लोकांची तपासणी आयसीएमआरच्या गाईडलाईन्सप्रमाणे वेगाने होणे गरजेचे आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रात म्हटले आहे.

मृत्यू कमी करणे मुख्य लक्ष्य
जगाच्या तुलनेत भारतात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमीच राहिले आहे. खरे तर आतापर्यंत इतरांच्या तुलनेत भारताची कामगिरी सरसच राहिली आहे. मात्र, यापुढेही आपला मुख्य उद्देश मृत्यू दर कमी करणे हाच असायला हवा. मृत्यू दर १ टक्क्याहून अधिक नसावा, हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवायला हवे. तसेच तपासणीचा वेग वाढवून रुग्णांना आयसोलेट अथवा अ‍ॅडमिट करणे आमि त्याना चांगल्या वैद्यकीय सुविधा पुरविणे किंवा त्यासंबंधी चांगले व्यवस्थापन करणे आवश्यक आहे, असेही म्हटले आहे.

Read More  देवणी तहसीलदाराची आरेरावीची भाषा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या