30.3 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलस प्रभाव तपासण्यासाठी अधिक डेटाची गरज

लस प्रभाव तपासण्यासाठी अधिक डेटाची गरज

एकमत ऑनलाईन

जिनिव्हा : कोरोनाचे जगभरात थैमान सुरू असताना दुसरीकडे लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपूर्ण जगाचे लक्ष ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनकाच्या लसीकडे लागले आहे. मात्र, या लसीच्या चाचणीच्या अंतरीम निष्कर्षामुळे लसीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. अमेरिकेतील तज्ज्ञांनी या लसीवर चिंता केल्यानंतर आता जागतिक आरोग्य संघटनेच्या शास्त्रज्ञांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. लस कितपत प्रभावी आहे, त्याचा प्रभाव किती आहे, याचे आकलन करण्यासाठी अधिक डेटाची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक सर जॉन बेल यांनी सीएनबीसीला सांगितले की, वृत्तपत्र निवदेनाद्वारे वैज्ञानिक परिणाम, निष्कर्ष यांची माहिती जाहीर करण्याबाबत अडचणी असतात. यामध्ये पूर्ण डेटा जाहीर केला जाऊ शकत नाही आणि लोकांना हा डेटा समजण्यासही कठीण जातो. जागतिक आरोग्य संघटनेचे इम्यूनायझेशन, वॅक्सीन आणि बायलॉजिकल्स डायरेक्टर केट ओ ब्रायन यांनी बेल यांच्या मताशी सहमती दर्शवली. केट यांनी सांगितले की, वृत्तपत्र निवदेनात फक्त मोजकीच आणि संक्षिप्त माहिती दिली जाऊ शकते. लस रोगप्रतिकारक शक्ती कशी निर्माण करते आदीबाबतची सविस्तर माहिती असावी लागते. जिनेव्हातील पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, वृत्तपत्र निवेदनात काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. मात्र, निष्कर्षामध्ये दिसत असलेल्या फरकासााठी काही कारणे असू शकतात.

अ‍ॅस्ट्राजेनकाची आकडेवारी खूपच कमी
दुसरीकडे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले की, अ‍ॅस्ट्राजेनकाच्या चाचणीचे आकडे कोणत्याही निष्कर्षांपर्यंत पोहचण्यासाठी खूपच कमी आहे. कमी प्रमाणातील लस डोसचा प्रभाव जाणून घेण्यासाठी आणखी चाचणीची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.

अमित शहांचा प्रस्ताव आंदोलकांनी फेटाळला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या