24.7 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeराष्ट्रीयमहागाईमुळे १ कोटींपेक्षा अधिक सिलिंडर रिकामे

महागाईमुळे १ कोटींपेक्षा अधिक सिलिंडर रिकामे

एकमत ऑनलाईन

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या पीएम उज्ज्वला योजनेअंतर्गत महिलांना मोफत गॅस सिलिंडर दिला जातो. याचा लाभ लाखो महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना झाला असल्याचे सांगितले जाते; मात्र माहितीच्या अधिकारातून नुकत्याच हाती आलेल्या आकडेवारीनुसार या योजनेतील अनेक महिलांनी पुन्हा सिलिंडर भरलेला नाही. याचे कारणही समोर आले आहे. सिलिंडरचे दर गगनाला भिडले असून दररोज किमतीत वाढ होण्याचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे महागाईला कंटाळून नागरिकांनी पीएम उज्ज्वला योजनेकडे पाठ फिरवित सिलिंडर पुन्हा न भरण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौड यांनी इंडियन ऑयल कॉर्पोरेशन लिमिटेड आयओसीएल, हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड एचपीसीएल आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड बीपीसीएल यांच्याकडून माहिती मागविली होती. यातून समोर आलेल्या माहितीनुसार २०२२-२३ या वर्षात ९० लाख लाभार्त्यांपैकी एकानेही सिलिंडर भरला नाही. १ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी वर्षभरात केवळ एकदाच सिलिंडर भरला.

या योजनेची सुरुवात १ मे २०१६ या दिवशी उत्तर प्रदेशातून झाली होती. मार्च २०२० पर्यंत या योजनेंतर्गत ८ कोटी नागरिकांना गॅस जोडणी देण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. या योजनेचा दुसरा टप्पाही सुरू झाला आहे. आतापर्यंत ९ कोटी नागरिकांनी गॅस जोडणी देण्यात आली आहे. आणखी १ कोटी नागरिकांना यात सहभागी करून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

९० लाख लाभार्थ्यांनी एकदाच भरला सिलिंडर
२०२२-२३ या वर्षात ९० लाख लाभार्र्थ्यांंपैकी एकानेही सिलिंडर भरला नाही. १ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी वर्षभरात केवळ एकदाच सिलिंडर भरला असल्याची माहिती उघड झाली आहे.

सर्व कंपन्यांचा तपशील
वर्षभरात एकही सिलिंडर न भरणा-या लाभार्थ्यांमध्ये बीपीसीएलचे २८.५६ लाख, आयओसीएलचे ५२ लाख, एचपीसीएलचे २७.५८ लाख लभार्थी आहेत. अलीकडेच सिलिंडरची किंमत ५० रुपयांनी वाढली. यामुळे एलपीजी सिलिंडरचीकिंमत १ हजार रुपयांपर्यंत पोहोचली. सिलिंडर महाग असल्याने उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांनी सिलिंडर भरून घेणे बंद केले आहे. त्यांनी पुन्हा चुलीचा वापर सुरू केला आहे.

कोरोनाकाळात १४.१७ सिलिंडर भरले
देशात कोरोनाने डोके वर काढल्यानंतर लॉकडाऊनच्या काळात सरकारने नागरिकांना दिलासा म्हणून ३ सिलिंडर देऊ केले होते. या योजनेतील लाभार्थ्यांना ३ सिलिंडर मोफत मिळत असल्याने नागरिकांनी या योजनेअंतर्गत १४.१७ कोटी सिलिंडर भरून घेतल्याची माहितीही यावेळी देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या