28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिकमध्ये तीनशेहून अधिक मंडळांना परवानगी नाकारली

नाशिकमध्ये तीनशेहून अधिक मंडळांना परवानगी नाकारली

एकमत ऑनलाईन

नाशिक : अवघ्या चार ते पाच दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी नाशिक महापालिकेकडे शहरातील ६०० हून अधिक मंडळांनी अर्ज दाखल केले असून यातील ३११ मंडळांना कागदपत्रांच्या पूर्ततेचा अभाव असल्याचे सांगून परवानगी नाकारण्यात आली आहे. तर केवळ ५७ मंडळांनाच आत्तापर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

कोरोनाचे मळभ दूर झाल्याने यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार असून गणेश मंडळं जोरदार तयारीला लागली आहेत. नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. चंद्रकांत फुलकुंडवार यांनी शहरात यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याबरोबरच गणेश मंडळांकडून दरवर्षी घेण्यात येणारे मंडप, फलक, कमानी यांचे कर घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या निर्णयाचे सर्वच मंडळांनी व गणेशभक्तांनी स्वागत केले आहे. परंतु मंडळांना परवानगी घेणे बंधनकारक असल्याने शहरातील गणेश मंडळांनी महापालिकेच्या नियमानुसार अर्ज दाखल केले आहेत.

दरम्यान नाशिक महापालिकेला आतापर्यंत ६६९ ऑनलाईन अर्ज दाखल झाले असूनही अर्ज दाखल झाल्यानंतर महापालिकेकडून अपेक्षित वेळेत हे काम होत नसल्याची तक्रार गणेश मंडळांकडून होत आहे. नाशिक महापालिकेने यंदा ऑनलाईन अर्ज दाखल करण्यास सांगितले असले तरी त्यात अग्निशमन दलाचा ना हरकत, बांधकाम विभागाची परवानगी आणि नंतर कर विभागाची संमती अनुसार ही परवानगी दिली जात असल्याने हे काम खूपच किचकट झाल्याचे गणेश मंडळांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीसाठी मंडळांनी काम केव्हा करायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या