कतार(फिफा): मोरोक्कोने रविवारी फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत मोठा धक्का दिला आहे. याने फिफा क्रमवारीत दुस-या क्रमांकावर असलेल्या बेल्जियमचा २-० असा पराभव केला आहे. या विश्वचषकात २२व्या क्रमांकावर असलेल्या मोरोक्कोचा हा पहिला विजय आहे.
क्रोएशियाविरुद्धचा त्यांचा शेवटचा सामना अनिर्णित राहिला होता. बेल्जियमचा ग्रुप-एफमधील हा पहिला पराभव आहे. गेल्या सामन्यात त्यांनी कॅनडाचा पराभव केला होता. त्याचे आता दोन सामन्यांतून तीन गुण झाले असून उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी त्याला क्रोएशियाविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे.
बेल्जियमचा पराभव या विश्वचषक मधील तिसरा मोठा अपसेट ठरला आहे. यापूर्वी सौदी अरेबियाने अर्जेंटिनाचा तर जपानने जर्मनीचा पराभव केला होता. मोरोक्कोने बेल्जियमचा २-० असा पराभव करून विश्वचषक मधला पहिला सामना जिंकला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात मोरोक्कोचा हा तिसरा विजय आहे. त्यांचा शेवटचा विजय १९९८ मध्ये होता. त्याआधी १९८६ मध्ये त्यांना पहिला विजय मिळाला होता. मोरोक्कोचा संघ सहाव्यांदा विश्वचषक खेळत आहे.