मुखेड प्रतिनिधी
मुखेड तालुक्यात कोरोना संक्रमित रुग्णाची संख्या आता तीनवर पोहोचली असून, दोन दिवसापूर्वी मुंबईहून आलेल्या एका तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. तर काल दि. २१ मे रोजी तालुक्यातील रावणकोळा येथील मुंबईतहुन परतलेल्या आई व मुलास कोरोना संक्रमण झाल्याचे निष्पन्न झाल. यामुळे आता तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन झाली असून, विशेष म्हणजे तिन्हीही रुग्ण हे मुंबईहून परतलेले आहेत.
Read More काँग्रेस आमदार अदिती सिंह पक्षातून निलंबित
मागील ४८ तासात मुखेड तालुक्यात तीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले आहेत. यात मुंबईहून परतलेला २४ वर्षीय तरुण पांडुर्णी शिवारात वास्तव्यास होता. त्याचा अहवाल पॉझिटिव आल्यानंतर मुखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र पुढील चोवीस तासात मुखेड तालुक्यात दोन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत. तालुक्यातील रावणकोळा येथील ३४ वर्षीय महिला व १४ वर्षीय मुलगा हे आई व मुलगा दि.१५ मे रोजी मुंबई येथील कांदिवली भागातून ट्रॅव्हल्स ने आपल्या गावी आले होते. त्यांनी गावातील आपल्या स्वत:च्या घरातच वास्तव्यास राहिले. यानंतर त्यांना कोरोना सदृश्य आजाराचे लक्षणे दिसून आल्यामुळे आरोग्य विभागाकडून त्यांना मुखेड येथील कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता ते काल दि. २२ मे रोजी सायंकाळी पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाला.
यानंतर तातडीने आरोग्य विभागाकडून पावले उचलत रावणकोळा गावात खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांना घराबाहेर पडण्यापासून मज्जाव करण्यात आला. तर या कोरोना संक्रमित आई व मुलाच्या संपर्कात आलेल्या १२ नातेवाईकांना कोव्हीड सेंटर मध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्या स्वँप चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. तसेच तालुक्यातील लखमापुर येथील पाच जणांना कोरोना सदृश्य आजार असल्यामुळे त्यांनाही मुखेड येथील कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांचे स्वॅप चे नमुने चे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांनी दिली आहे.