35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home क्राइम जावयाने सासूला ट्रॅक्टरने चिरडले; खुनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ

जावयाने सासूला ट्रॅक्टरने चिरडले; खुनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ

एकमत ऑनलाईन

बीड जिल्ह्यामध्ये खुनाचे सत्र सुरूच : महिनाभरामध्ये आठ खून

बीड : बीड जिल्ह्यात खुनाच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. महिनाभरामध्ये आठ खून झालेल्या बीड जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना घडल्या आहेत. एक घटना बीड तालुक्यातील नेकनूर येंथे घडली. जावायाने सासूला ट्रॅक्टरखाली चिरडून प्रेत पुरल्याची घटना काल रात्री घडली तर दुसरी घटना अंबाजोगाईतील खोपरटोन येथे घडली. या दोन घटनांनी जिल्हा हादरला.

बीड जिल्ह्यामध्ये खुनाचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी रात्री दोन खून झाले. अंबाजोगाई तालुक्यातील खोपरटोन येथे शाळेजवळ असलेल्या पाण्याच्या टाकीच्या बाजुला ज्ञानोबा सोपान मुसळे (३५) या व्यक्तीचा मृतदेह आढळला. दुसऱ्या ठिकाणी खून करून मृतदेह पाण्याच्या टाकीच्या बाजुला आणून टाकण्यात आला असा अंदाज आहे. अज्ञात व्यक्तीच्य विरोधात बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

Read More तिहेरी हत्याकांडानं बीड हादरलं; महिलेसह दोन मुलांची निर्घृण हत्या

बर्दापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दुसरी घटना बीड तालुक्यातील नेकनूरजवळील मांडवखेल येथे घडली. बीड येंथील अंकुशनगर भागामध्ये वास्तव्यास असणाऱ्या अलका हनुमंत जोगदंड (४०) हे मयत महिलेचे नाव आहे. ही महिला २ जूनपासून बेपत्ता असल्याची फिर्याद पतीने नेकनूर पोलिसात दिली होती.

या महिलेच्या मुलीचा सासरी छळ केला जात होता. त्याचा जाब विचारण्यासाठी ही महिला मुलीच्या सासरी दाखल झाली होती. ट्रॅक्टर घेऊन जाणाऱ्या जावयाला जाब विचारणाऱ्या सासूच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जावयाने चिरडले. त्यानंतर दगडाने ठेचून त्या महिलेचा मृतदेह पुरला मात्र पोलिसांनी या घटनेला वाचा फोडली. जावायाला आणि जावायाच्या वडिलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी नेकनूर पोलीस अधिक तपास करत आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या