23.1 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeमराठवाडामोटारमनने वाचवला महिलेचा जीव

मोटारमनने वाचवला महिलेचा जीव

एकमत ऑनलाईन

औरंगाबाद : औरंगाबादमधील मुकुंदवाडी रेल्वे स्टेशनजवळ एक थरारक घटना समोर आली. रेल्वे रुळावर अचानक एक महिला समोर आली. त्याचवेळी जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस समोरून आली. पण मोटरमनने प्रसंगवधान राखत वेळेवर रेल्वे थांबवली. त्यामुळे महिलेचा जीव अगदी थोडक्यात वाचला. आज सकाळी ९ च्या सुमारास मुकुंदवाडी रेल्वे स्थानकासमोर ही घटना घडली.

नियमित प्रमाणे जालना-दादर जनशताब्दी एक्स्प्रेस जालन्याहून औरंगाबाद रेल्वे स्थानकाकडे येत होती. ताशी १०० किमी वेगाने ही गाडी धावत होती. ही रेल्वे मुकुंदवाडी रेल्वे स्टेशन जवळ पोहोचली असता एक महिला रेल्वे रुळ ओलांडत असताना लक्षात आली. जनशताब्दीच्या मोटरमनने तातडीने हॉर्न वाजवून तिला बाजूला होण्याचा इशारा दिला. पण गाडीचा वेग प्रचंड होता. पण चालकाने अत्यंत कौशल्याने रेल्वे नियंत्रणात आणून रेल्वे थांबविली आणि महिलेचा जीव वाचवला. ताशी १०० कि.मी.चा वेग असताना अवघ्या ५०० मीटर अंतरावरच गाडी थांबविण्यात मोटरमनला यश आले.

मात्र, रेल्वे इंजिनसह चार डबे पुढे जाऊन रेल्वे थांबली होती. इंजिनच्या प्रेशर हॉर्नमुळे महिला रेल्वे रुळावर झोपली होती. या महिलेच्या अंगावरून इंजिनसह 3 डब्बे गेले होते. पण ही महिला सुखरूप होती. मोटरमन आणि रेल्वे कर्मचा-यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन महिलेला बाहेर काढले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या