27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयकाश्मिरी पंडितांना सुरक्षित ठिकाणी हलवा; केंद्राचे आदेश

काश्मिरी पंडितांना सुरक्षित ठिकाणी हलवा; केंद्राचे आदेश

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खो-यात काश्मिरी पंडितांच्या हत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाढत्या घटनांनंतर येथील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान, काश्मीर पंडितांच्या हत्यांच्या वाढत्या घटनांनंतर सरकारने श्रीनगर येथील १७७ काश्मिरी पंडित शिक्षकांच्या सुरक्षित ठिकाणी बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत. काश्मिरी पंडित समुदाय आणि स्थलांतरित कामगारांना लक्ष्य करणा-या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अशांत केंद्रशासित प्रदेशातील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांनी एक उच्चस्तरीय बैठक घेतली. त्यानंतर वरील आदेश देण्यात आले आहेत.

मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात १२ मे रोजी दहशतवाद्यांनी राहुल भट यांची हत्या केली होती. त्यानंतर २०१२ मध्ये पंतप्रधानांच्या विशेष पॅकेज अंतर्गत काम केलेल्या अनेक काश्मिरी पंडितांकडून पलायनाचा इशारा देत मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात येत आहेत. ही घटना ताजी असतानाच गुरुवारी दहशतवाद्यांनी बँकेत घुसून एका बँक कर्मचा-याची हत्या केली. साधारण एक मेपासून खो-यामध्ये करण्यात आलेल्या आतापर्यंतच्या घटनांमध्ये ९ जणांना ठार मारण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या