24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeमहाराष्ट्रखासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीला अपघात

खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीला अपघात

एकमत ऑनलाईन

नंदुरबार : नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचा खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीचा अपघात झाल्याने खासदार गावित किरकोळ जखमी झाल्या आहेत. शिवाय सहकारी देखील जखमी झाले असून प्राथमिक उपचारानंतर डॉ. गावित या पुढील उपचारासाठी मुंबईकडे रवाना झाल्या आहेत.

नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. हिना गावित दोन दिवसांवर येऊन ठेपलेल्या आदिवासी दिनाच्या कार्यक्रमा निमित्ताने अनेक कार्यक्रमांना भेट देत आहेत. अशातच आदिवासी दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बाईक रॅलीच्या उद्घटनासाठी जात असताना हा अपघात घडला. सकाळी त्या घरातून निघाल्यानंतर शहरातील कोरीट नाका येथे रॅलीचा शुभारंभ होता.

हा शुभारंभ आटोपून त्या एका पतसंस्थेच्या कार्यक्रमासाठी शहरातील एका ठिकाणी जात असताना अचानक मोटारसायकलस्वार अचानक गाडीसमोर आल्याने हा अपघात झाला.

अचानक गाडीसमोर आलेल्या दुचाकीस्वाला वाचविण्याचा प्रयत्न करत असताना खासदार हिना गावित यांची गाडी झाडावर आदळली. या अपघातात खासदार हिना गावित यांच्यासोबत असलेले चार कार्यकर्तेही किरकोळ जखमी झालेले आहेत तर मोटर सायकल स्वारही जखमी झाले आहेत. या अपघातात खासदार हिना गावित यांच्या नाकाला मार लागला असून नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले आहे, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांनी दिले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या