28.2 C
Latur
Thursday, August 18, 2022
Homeमहाराष्ट्रगटनेतेपदाच्या भूमिकेत खासदार विनायक राऊत अपयशी

गटनेतेपदाच्या भूमिकेत खासदार विनायक राऊत अपयशी

एकमत ऑनलाईन

मुंबई : शिवसेनेचे नेते खासदार विनायक राऊत यांनी केलेल्या आरोपांवर खासदार राहुल शेवाळे यांनी उत्तर दिले आहे. विनायक राऊत यांनी खासदारांना न्याय दिला नाही. त्यांनी आम्हाला आमच्या विचारांविरोधात भूमिका मांडण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप राहुल शेवाळे यांनी केला.

खासदार राहुल शेवाळे यांच्यासह १२ खासदारांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. या १२ खासदारांच्या पत्रानंतर लोकसभा अध्यक्षांनी शेवाळे यांची शिवसेना लोकसभा गटनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर केले.

बंडखोर खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले की, गेली दोन-अडीच वर्षे विनायक राऊत यांनी आम्हाला आमच्या विचारसरणीविरोधातली भूमिका मांडण्याचे आदेश दिले होते. खासदारांना न्याय मिळवून देण्यात गटनेत्याची भूमिका महत्त्वाची असते. पण ती भूमिका बजावण्यात विनायक राऊत अयशस्वी ठरले. त्यामुळे आम्ही सर्व खासदारांनी मिळून गटनेतेपदाचा निर्णय घेतला असल्याचे शेवाळे यांनी सांगितले.

गटनेत्याची निवड ही विधिमंडळ पक्षाच्या सदस्यांना करण्याचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाचे आधीचे निकालही हेच सांगतात. आम्ही कुठलेही नियमबा काम केले नसल्याचा दावाही शेवाळे यांनी केला. लोकसभेतील पक्षाचे कार्यालय हे शिवसेना पक्षाचे आहे. ते कुठल्याही गटाचे नसल्याचे शेवाळे यांनी स्पष्ट केले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या