25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeमहाराष्ट्रफडणवीस साहेब, तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले?

फडणवीस साहेब, तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले?

एकमत ऑनलाईन

मुंबई : आज विधानसभा अध्यक्षांची निवड केली गेली. यामध्ये राहुल नार्वेकर हे देशाच्या इतिहासातील सर्वांत तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत.

यावेळी सभागृहातील अनेक नेत्यांनी नवनिर्वाचित विधानसभा अध्यक्षांचे अभिनंदन करताना भाषणे केली. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले

. थोरात म्हणाले की, अध्यक्ष राहुल नार्वेकर तुम्ही आदित्य ठाकरे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस सगळ्यांचेच खास आहात. पण काँग्रेसच्या जवळ का नाहीत ते कळत नाही? सगळ्यांना तुम्ही आपलेसे वाटणारे अध्यक्ष आहात.

एकनाथ शिंदे शाखा प्रमुखापासून मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहोचले, त्यांचे कौतुक वाटते, पण फडणवीसजी तुमचं कसं कौतुक करायचं हाच प्रश्न आम्हाला पडतो. त्यातच तुम्ही चांगले वक्ते असणारे राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी निवड करून तुम्ही एका दगडात किती पक्षी मारले? असा खरमरीत प्रश्नही थोरात यांनी यावेळी उपस्थित केला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या