37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयजगातील श्रीमंतांच्या टॉप-१० मधून मुकेश अंबानी बाहेर

जगातील श्रीमंतांच्या टॉप-१० मधून मुकेश अंबानी बाहेर

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : यावर्षी कमाईच्या बाबतीत जगातील अव्वल श्रीमंतांना मागे टाकणारे भारतीय उद्योगपती गौतम अदानी यांना एका पाठोपाठ एक मोठे धक्के बसत आहेत. मागील काळापासून कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतलेल्या लोअर सर्किटमुळे त्यांची मालमत्ता कमी झाली आहे. याचा परिणाम असा झाला की, टॉप-१० अब्जाधीशांच्या यादीत दीर्घकाळ पाचव्या स्थानावर राहिल्यानंतर अदानी आता सातव्या स्थानावर घसरले आहेत. याशिवाय त्यांच्या दोन कंपन्यांचे मार्केट कॅपही खराब झाले आहे.
एकूण संपत्तीत मोठी घसरण
आशियातील सर्वांत श्रीमंत आणि दीर्घकाळ टॉप-१० श्रीमंतांच्या यादीत पाचव्या स्थानावर वर्चस्व गाजवणारे गौतम अदानी बुधवारी सहाव्या स्थानावर घसरले होते, तर शुक्रवारी त्यांच्या नेटवर्थमध्ये झालेल्या मोठ्या घसरणीमुळे ते आता या क्रमांकावर आहेत. ते या यादीत सातव्या क्रमांकावर घसरले आहेत. अब्जाधीश निर्देशांकानुसार, गेल्या २४ तासांत त्यांची एकूण संपत्ती ५.८४ अब्ज डॉलरने कमी होऊन १०२ अब्ज झाली आहे. त्यांच्या जागी लॅरी पेज आता सहाव्या स्थानावर पोहोचले आहेत.

एका महिन्यात कमी झाली मार्केट कॅप
एका अहवालानुसार, शेअर बाजारात नुकत्याच झालेल्या विक्रीनंतर गौतम अदानी समूहाच्या खाद्यतेल कंपनी अदानी विल्मार आणि अदानी पॉवरचे मार्केट कॅप १ लाख कोटी रुपयांच्या खाली आले आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, अदानी पॉवरचे बाजार भांडवल गुरुवारी, १२ मे रोजी ९३,५५०कोटी रुपयांवर घसरले, तर अदानी विल्मारचे बाजार भांडवल ७५,६१५कोटी रुपयांवर घसरले. या दोन्ही कंपन्यांनी एप्रिल महिन्यातच १ लाख कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह कंपन्यांच्या क्लबमध्ये प्रवेश केला होता.

३० टक्क्यांहून अधिक घसरले अदानी विल्मारचे शेअर
गौतम अदानी समूहाची कंपनी अदानी विल्मार आणि अदानी पॉवरच्या शेअर्समध्ये लोअर सर्किट झाल्यामुळे कंपनीच्या मूल्यावर विपरीत परिणाम झाला आहे. अदानी विल्मारचे स्टॉक ८ फेब्रुवारी रोजी शेअर बाजारात रु. २२७ वर सूचिबद्ध झाला होता, जो त्याच्या आयपीआय किंमत ब्रँड रु. २३० पेक्षा किरकोळ कमी होता. यानंतर, त्याने आपल्या गुंतवणूकदारांची बरीच चांदी केली आणि एप्रिलमध्ये ती उच्च पातळीवर पोहोचली. तो ८७८रुपयांच्या पातळीवर पोहोचला, परंतु त्यानंतर तो एवढा घसरला की, तो २९५ रुपयांच्या उच्चांकावरून ३० टक्क्यांहून अधिक घसरला आहे. गुरुवारीही त्यात पाच टक्क्यांनी घट झाली.

११व्या स्थानावर मुकेश अंबानी
गौतम अदानी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी ब-याच काळापासून टॉप-१० च्या यादीत आपले स्थान घट्ट करून होते. मात्र शुक्रवारी घसरणीमुळे मुकेश अंबानी आता या यादीतून बाहेर पडले आहेत. इतर श्रीमंतांबद्दल बोलायचे तर अ‍ॅलन मस्क २१५ अब्ज डॉलर्सच्या संपत्तीसह पहिल्या स्थानावर आहेत. तर जेफ बेझोस १३१ अब्ज डॉलरसह दुस-या आणि बर्नार्ड अरनॉल्ट १२२ अब्जसह तिस-या स्थानावर आहेत.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या