मुखेड:प्रतिनिधी
मोठ्या शहरातून मुखेड तालुक्यात तब्बल १९ हजार नागरिक दाखल झाले असून यातील ४२१४ नागरिकांची स्कॅनिंग करण्यात आली़ यातील ५४ संशयीतांचे स्वॅब नमुने घेण्यात आले होते. यात ४२ अवहाल निगेटिव्ह तर १२ अवहाल प्रलंबित असल्याची माहिती मिळाली आहे.
मागील दोन महिन्यापासून देशभरात लॉकडाऊन सुरू आहे मात्र यादरम्यान मोठ्या शहरात राहणाºया ग्रामीण भागातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल सुरू होते. केंद्र शासनाने मोठ्या शहरात असणाºया ग्रामीण भागातील नागरिकांना गावाकडे जाण्याची मुभा दिली. यानंतर मुखेड तालुक्यात तब्बल १९ हजार नागरिक दाखल झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली आहे. तसे पाहता त्याच्या कितीतरी पटीने जास्त नागरिक मुखेड तालुक्यात दाखल झाले असल्याचे कळते. मात्र त्यातील अनेकांनी आपली नोंदणी कोव्हीड केअर सेंटरमध्ये केली नसल्याचेही दिसून येत आहे.
मुखेड शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयात आरोग्य विभागाकडून कोव्हीड केअर सेंटर तपासणी कक्ष सुरू करण्यात आले आहे. येथे रुग्णांना २४ तास सेवा उपलब्ध करून दिल्या जात असून याठिकाणी १०० बेडचे विलगीकरण कक्षही उभारण्यात आले आहे. मोठ्या शहरातून आलेल्या नागरिकांची स्कॅनिंग व इतर तपासणी यात कोव्हीड केअर सेंटर मध्ये करण्यात येत आहे. यात आजवर ४२१४ नागरिकांची स्कॅनिंग करण्यात आली आहे. तर मोठ्या शहरातून आलेल्या सर्वच नागरिकांना आरोग्य विभागाकडून होम कोरनटाईन करण्यात आले आहे.
स्कॅनिंग करण्यात आलेल्या नागरिकांपैकी काही संशयित नागरिकांचे व इतर तालुक्यांमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना सोबत सह प्रवास केलेल्या ५४ नागरिकांच्या स्कॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. यातील ४२ आवहाल निगेटिव्ह आले असून १२ आवाहल हे प्रलंबित आहेत. तर प्रलंबित १२ अहवालापैकी १० नागरिक हे उदगीर तालुक्यात पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत,असेकोव्हीड सेंटरचे नोडेल अधिकारी डॉ. नागेश लखमावार व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांनी दिली.
मुखेड शहरात दररोज शेकडो वाहनाने पुणे-मुंबई या सारख्या मोठ्या शहरातून नागरिक येत आहेत. मात्र यातील काही नागरिक हे मुखेड शहरात उभारण्यात आलेला कोव्हीड केअर सेंटरमध्ये आपली तपासणी न करताच परस्पर गावाकडे निघून जात असल्याचेही दिसून येत आहे. नागरिकांनी मनात भीती न बाळगता व कसल्याही अफवांची भिती न बाळगता आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी जेणेकरून त्यांना व त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांच्या आरोग्यास धोका निर्माण होणार नाही. यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपली नाव नोंदणी करून आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
Read More सरकारी बँकांचा उद्योगांना आधार
Read More १० टक्के पीएफ योगदान सुविधा लागू