37.3 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeक्रीडामुंबईने लावली चेन्नईची वाट

मुंबईने लावली चेन्नईची वाट

एकमत ऑनलाईन

मुंबई : डॅनिअल सॅम्सच्या भेदक मा-यानंतर तिलक वर्माच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर मुंबईने चेन्नईचा पाच गड्यांनी पराभव केला. यंदाच्या हंगामातील मुंबईचा हा तिसरा विजय ठरला आहे, तर चेन्नईचा आठवा पराभव झाला आहे. या पराभवासह चेन्नईचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आले. मुंबईनंतर यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईला धक्का बसला. मुंबईचे याआधीच स्पर्धेतील आव्हान संपलेले आहे. मुंबईने जाता जाता चेन्नईचीही वाट लावली.

चेन्नईने आतापर्यंत आयपीएलचे १३ हंगाम खेळली आहे. यापैकी ११ वेळा ते प्लेऑफसाठी पात्र ठरले होते. २०२० आणि २०२२ मध्ये चेन्नई प्लेऑफमधून बाहेर पडली. याआधी प्रत्येक हंगामात चेन्नईने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. यापैकी तब्बल चार वेळा चेन्नईने आयपीएल चषक पटकावला. पाच वेळा चेन्नई उपविजेता राहिली, तर दोन वेळा सेमीफायनलपर्यंत धडक मारली.

आयपीएलच्या इतिहासात चेन्नई संघ प्लेऑफमध्ये नसण्याची ही दुसरी वेळ आहे. २०२० मध्ये चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहोचता आले नव्हते. त्यानंतर आता चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले आहे. पाच वेळा आयपीएल चषक विजेता मुंबई आणि चार वेळा चषक जिंकणारा चेन्नई संघ यंदा प्लेऑफमध्ये दिसणार नाहीत.

सर्वात यशस्वी संघ तळाशी
आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई आणि चेन्नईला ओळखले जाते. दोन्ही संघाकडे मिळून ९ आयपीएलचे चषक आहेत. पण या दोन्ही संघाला यंदा प्लेऑफमध्ये पोहोचता येणार नाही. मुंबईच्या संघाला १२ सामन्यात ९ पराभव स्वीकारावे लागले, तर चेन्नईच्या संघाला १२ सामन्यांत ८ पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नई नवव्या तर मुंबई दहाव्या क्रमांकावर आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या