21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई, कोकणात तुफान पाऊस; मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिका-यांना निर्देश

मुंबई, कोकणात तुफान पाऊस; मुख्यमंत्री शिंदेंचे जिल्हाधिका-यांना निर्देश

एकमत ऑनलाईन

मुंबई : हवामान खात्याने पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच सध्या देखील मुंबईसह कोकण किनारपट्टीच्या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढला आहे. यामुळे पूर परिस्थिती निर्माण होऊन जीवित व मालमत्तेची हानी होऊ नये म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: कोकणातील सर्व जिल्ह्यांच्या जिल्हाधिका-यांच्या संपर्कात आहेत. एनडीआरएफ जवानांना तसेच इतर पथकांना सज्ज राहण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये नागरिकांना पावसामुळे वाढत्या पाण्याची आणि पूर परिस्थितीची वेळीच सूचना द्यावी, तसेच पूरग्रस्त भागातून स्थलांतर करावे लागल्यास योग्य ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी, असे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले आहेत.

मुंबईतील परिस्थितीवर देखील मुख्यमंत्री बारकाईने लक्ष ठेवून आहेत. कोकणातील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.

अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडी कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत आहे. या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ नये यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागांना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती
मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विटद्वारे माहिती देण्यात आली आहे. वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. संबंधित पालक सचिवांना त्या-त्या जिल्ह्यांमध्ये पोहोचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत.

पूर परिस्थितीत नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवा, एनडीआरएफ पथकांना सज्ज ठेवा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिका-यांना दिल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडून ट्विट करून देण्यात आली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या