24.8 C
Latur
Saturday, November 27, 2021
Homeमहाराष्ट्रमुंबईतील हत्याकांड : ९ तरुणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

मुंबईतील हत्याकांड : ९ तरुणांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली

एकमत ऑनलाईन

क्रिकेट खेळत असताना कुत्र्याने चेंडू तोंडात पकडला आणि तो सोडला नाही : दुस-या दिवशी घरात घुसून तलवार व चाकूने वार करत हत्या करणा-या नऊ तरुणांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा

मुंबई (प्रतिनिधी) : क्रिकेट खेळत असताना पाळीव कुत्र्याने चेंडू तोंडात पकडला आणि तो सोडला नाही, या कारणातून कुत्र्याचे मालक अनिल पांडे यांच्यासोबत वाद झाल्यानंतर दुस-या दिवशी त्यांच्या घरात घुसून तलवार व चाकूने वार करत त्यांची हत्या करणा-या नऊ तरुणांना सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. भांडुपमध्ये पाच वर्षांपूर्वी ही घटना घडली होती.

२४ जणांची साक्ष न्यायालयात नोंदवली

न्या. किशोर जैस्वाल यांनी आरोपी नऊ तरुणांना नुकतीच शिक्षा सुनावली. समीर चव्हाण (२१), गौतम घाडगे (२५), सूरज गवस (२६), समीर कदम (२६), रवींद्र वनारे (२२), सौरभ खोपडे (१८), विशाल पराड (२१), सचिन हातपळे (२३) व विश्वदीप नाईक (२५) अशी या दोषींची नावे आहेत. सरकारी पक्षाने त्यांच्याव्यतिरिक्त २४ जणांची साक्ष न्यायालयात नोंदवली, असे सरकारी वकील इक्बाल सोलकर यांनी सांगितले.

२०१५ साली ही घटना घडली

पाच वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ साली ही घटना घडली. अनिल यांची पत्नी प्रिया (वय ३२) ही या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आहे. टोळीनं हल्ला केला त्यावेळी त्या घरात होत्या. त्यांनी आपल्या दोन लहान मुलींसह पळ काढून स्वत:चा आणि मुलींचा जीव वाचवला होता. कोर्टात त्यांनी आरोपींना ओळखले. अनिलवर हल्लेखोरांनी तलवार, चाकू आणि बॅटने वार केले होते.

पेन्शन हा मूलभूत अधिकार; कायदेशीर परवानगीशिवाय कपात करता येणार नाही

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या