मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत मुंबई महानगरपालिकेत कार्यरत अभियंत्यास लाच स्वीकारताना शनिवारी संध्याकाळी रंगेहाथ अटक केली आहे. सुनील भारंबे असे आरोपी अभियंत्याचे नाव असून तो मुंबई महापालिकेच्या ए वॉर्डमध्ये कार्यरत होता.
या प्रकरणात तक्रारदार त्यांच्यासोबत त्यांच्या मित्राच्या चर्चगेट भागातील हुक्का पार्लरसाठी लायसनिंगचे काम करतात. पार्लरसाठी संबंधित शासनाच्या परवानग्यांचे काम तक्रारदार पाहतात. २६ एप्रिल रोजी काही महापालिकेच्या अधिका-यांमार्फत हुक्का पार्लरची पाहणी करण्यात आली. त्यानंतर तक्रारदाराची आरोपी अभियंत्याशी भेट झाली.
हुक्का पार्लरमध्ये अधिकचा पोटमाळा असून हा पोटमाळा बेकायदेशीर असल्याचा दावा अभियंत्याने तक्रारदाराकडे केला. याबाबत कारवाई न करण्यासाठी अभियंत्याने पाच लाख रुपयांची लाच मागितली. अखेर तडतुडेंनी सौदा तीन लाख रुपयांत ठरला. ६ एप्रिल (शनिवार) रोजी संध्याकाळी चर्चगेट स्टेशन परिसरात अभियंत्याला लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले आणि अटक केली.