28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका शिंदे-फडणवीस सरकार जिंकणार

मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका शिंदे-फडणवीस सरकार जिंकणार

एकमत ऑनलाईन

मुंबई : भाजप आणि शिवसेना एकत्र आहोत. मुंबई महापालिकेत आमचे १५० पेक्षा जास्त नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही मुंबई महापालिका, पुणे महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिका जिंकणार आहोत. त्यासोबतच सगळ्या नगरपालिकांसोबतच जिल्हा परिषदेच्या निवडणुकादेखील आम्ही जिंकू, असा विश्वास मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. ते पुण्यात बोलत होते.

यंदाचा दसरा मेळावा कोण करेल हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठरवतील. मुख्यमंत्री हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या विचारासाठी त्यांनी लढा दिला, तसाच त्यांची दस-याची परंपरा कायम ठेवण्यासाठीही ते कटिबद्ध आहेत. परंतु याबाबत काय करायचं याचा मुख्यमंत्री निर्णय घेतील.

यामध्ये मुख्यमंत्री कोणते राजकारण येऊ देणार नाहीत, असे विधान त्यांनी केले आहे. दसरा मेळाव्याचे श्रेय घेण्यासाठी हा प्रयत्न नसेल तर ख-या अर्थाने बाळासाहेबांबद्दल असलेला आदर त्यांची भूमिका आणि व्यापक हिंदुत्ववाद हेच तत्त्व पुढे घेत आम्ही कार्य करत आहोत, असे मत देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

न्यायालयाच्या प्रक्रियेवर बोलण्यास नकार
महाराष्ट्राला जे सरकार मिळाले आहे. त्यांच्याकडून चांगले काम व्हावे असे गणपती बाप्पांकडे साकडे घालतो. न्यायालयाचे निकाल न्यायालय देत असते. आज निकाल नाही प्रक्रिया सुरू आहे. लोकशाही कशापद्धतीने मजबूत होईल यावर न्यायालय योग्य निर्णय देत असते. मात्र न्यायालय प्रक्रियेवर भाष्य करू नये. सरन्यायाधीशांनी सांगितले आहे की, मीडिया ट्रायल घेऊ नये. त्यामुळे आम्ही या कोर्टाच्या निर्णयावर किंवा न्यायालयीन प्रक्रियेवर कोणतेही भाष्य न करण्याचा निर्णय घेतला आहे, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या खासदार मुलाच्या जागी भाजपचा दावा
कोणी कशावर दावा करावा, हे प्रत्येकाच्या मनावर असते. दावा करणे म्हणजे निवडून येणे नाही. हे लक्षात असू द्या. शिवसेना-भाजप अशी अभेद्य युती होती, त्यानंतर मिशन १५१ कोणी काढले? हे सर्वांना माहीत आहे. समोरच्या लोकांना, जनतेला दुखवायचे. जनतेच्या समोर हिंदुत्व म्हणून जायचे आणि नंतर सत्तेसाठी निष्ठा बदलायची, हे महाराष्ट्राच्या जनतेने कदापि सहन केले नसते. त्यामुळे आम्ही जनतेसाठी काम करतो आहोत. महाराष्ट्र हे प्रगतिशील राज्य आहे. राज्याची प्रगती खुंटलेली होती त्यावर आम्ही काम करत आहोत. महाराष्ट्राची देदीप्यमान संस्कृती होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या