24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeक्रीडामुंबईचे दिल्लीला १६० धावांचे लक्ष्य

मुंबईचे दिल्लीला १६० धावांचे लक्ष्य

एकमत ऑनलाईन

मुंबई : मुंबईचा स्टार फलंदाज जसप्रीत बुमराहने दिल्लीविरुद्ध चमकदार कामगिरी करून दाखविली आहे. या सामन्यात त्याने दिल्लीच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना आपल्या जाळ्यात अडकवून माघारी धाडले. जसप्रीत बुमराहसह रमनदीप सिंह, डेनियल सॅम्स आणि मयंक मार्कंडे आणि चांगली गोंलदाजी केली. ज्यामुळे दिल्लीच्या संघाला २० षटकांत सात विकेट्स गमावून १५९ धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक ४३ धावा केल्या.

प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या दिल्लीच्या संघाची सुरुवात खराब झाली आहे. दिल्लीच्या डावातील तिस-याच षटकांत जसप्रीत बुमराहने डेव्हिड वार्नरच्या (५ धावा) रुपात दिल्लीला पहिला धक्का दिला. त्यानंतर मिचेश मार्शही (० धाव) डेनियल सॅम्सच्या गोलंदाजीचा शिकार ठरला. गेल्या काही सामन्यांपासून संघाबाहेर असलेल्या पृथ्वी शॉ (२४ धावा) आजच्या सामन्यात मोठी धावसंख्या करेल, अशी अपेक्षा केली जात होती.

मात्र, तोही पावर प्लेच्या अखेरच्या षटकात बाद झाला. दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यालाही संघाची धावसंख्या पुढे नेता आली नाही. त्याने ३३ चेंडूत ३९ धावा केल्या. दिल्लीकडून रोव्हमन पॉवेलने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. ज्यात चार षटकार आणि एक चौकाराचा समावेश होता. रोव्हमन पॉवेल बाद झाल्यानंतर दिल्लीच्या कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा गाठता आला नाही. मुंबईकडून जसप्रीत बुमराहने सर्वांधिक तीन विकेट्स घेतल्या. तर, रमनदीप सिंहला दोन विकेट्स मिळाल्या. याशिवाय, डेनियल्स सॅम्स, मयांक मार्कंडेय यांना प्रत्येकी एक-एक विकेट मिळाली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या