16.6 C
Latur
Sunday, January 23, 2022
Homeमुंबईकर जेमिमा झाली ‘रॉकस्टार’ : बीसीसीआयने व्हीडीओ केला शेअर

मुंबईकर जेमिमा झाली ‘रॉकस्टार’ : बीसीसीआयने व्हीडीओ केला शेअर

एकमत ऑनलाईन

मुंबई : महिला क्रिकेटपटू जेमिमा रॉड्रीग्जने बॉलिवूडच्या गाण्यावर ताल धरला होता. महिला सिक्युरिटी गार्डसोबत तिने मस्त डान्स केला होता. त्यानंतर आता जेमिमाने गायनकौशल्यदेखील दाखवले आहे. बीसीसीआयने रविवारी जेमिमाचा एक व्हीडीओ ट्विट केला. तो व्हीडीओ आधी जेमिमाने स्वत:च्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. त्यानंतर बीसीसीआयलादेखील तो व्हीडीओ शेअर करण्याचा मोह आवरला नाही. बीसीसीआयने तो व्हीडीओ ट्विट करत जेमिमाला इन-हाऊस रॉकस्टार घोषित करून टाकले. जेमिमा व्हीडीओमध्ये तीन-चार गाण्यांची झकास मेडली (मॅश-अप) गायिली.

Read More  मेजर सुमन गावनी यांना युएनचा मिलिट्री जेंडर ऍडव्होकेट पुरस्कार

जेमिमाने सुरुवात ‘चाँद सा रोशन’ चेहरा गाण्याने केली. त्यानंतर ‘है अपना दिल तो आवारा’, ‘आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जुबान पर’ आणि शेवटी ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ अशी चार गाण्यांची गुंफण करून मस्त मैफिल रंगवली. दरम्यान, आॅस्ट्रेलियातील टीम इंडियाने महिला टी-२० विश्वचषक २०२० स्पर्धेच्या वेळी देखील जेमिमाने आनंदाच्या भरात एका महिला सिक्युरिटी गार्डसोबत काही डान्स स्टेप्स केल्या होत्या. अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता कार्तिक आर्यन यांच्या ‘लव आज कल – २’ चित्रपटातील ट्विस्ट या गाण्यावर जेमिमाने ताल धरला होता. या भन्नाट गाण्यावर नाचण्याचा मोह त्या महिला सिक्युरिटी गार्डला देखील आवरला नाही. त्यामुळे त्या दोघींनी धमाकेदार डान्स केला.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या