गांभीर्य नसल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला : लॉकडाऊनमध्ये सलून उघडण्यास सक्त मनाई
केस कटिंग व दाढी करण्यासाठी ग्राहकांनी रांगा लावल्या
मुंबई, : लॉकडाऊनमध्ये दुकाने उघडणार्या सलूनवाल्यांची मुंब्रा पोलिसांनी चांगलीच ‘हजामत’ केली आहे. पोलिसांनी सलूनवर धाड टाकत सामानासह 10 जणांना अटक केली आहे. यामध्ये तीन सलून कर्मचार्यांसह ग्राहकांचा समावेश आहे.
कोरोनाने मुंब्य्राला चारही बाजूने घेरले असतानाही येथील रहिवाशांना अद्यापी त्याचे गांभीर्य नसल्याचा प्रकार पुन्हा उघडकीस आला आहे. शहरात लॉकडाऊनची एैशीतैशी करत मनमानी कारभार सुरूच आहे. त्यात आता सलूनवाल्यांनी भर टाकली आहे.
Read More सचिन तेंडुलकरने कुटुंबियांसाठी बनवली मँगो कुल्फी
लॉकडाऊनमध्ये सलून उघडण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. मात्र ईदच्या निमित्ताने शहरातील ओल्ड नशेमन कॉलनी येथील सलून उघडण्यात आले. केस कटिंग व दाढी करण्यासाठी तेथे ग्राहकांनी रांगा लावल्या. याबातची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाली. त्यानुसार त्यांनी छापा टाकून सलून बंद पाडले. तसेच येथील तीन कर्मचारी आणि सात ग्राहकांना ताब्यात घेऊन अटक केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक विनायक कराडे यांनी दिली.