23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeक्राइमजुन्नरमध्ये किरकोळ वादातून मित्राची हत्या

जुन्नरमध्ये किरकोळ वादातून मित्राची हत्या

एकमत ऑनलाईन

पुणे : मित्राची क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे हा प्रकार घडला. किरकोळ वादातून ही हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. पुजा-याने आपल्याच मित्राचा जीव घेतल्याचा आरोप आहे. अखेर या हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आणि नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपी पुजा-याला बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथे पुजा-याने आपल्याच मित्राचा खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. किरकोळ वादातून पुजा-याने आपल्याच मित्राची हत्या केली.

क्षुल्लक कारणावरून संभाजी गायकवाड यांची हत्या झाली होती. त्यांचेच मित्र पिंटू ऊर्फ रामदास पवार यांनी निर्घृणपणे हत्या केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. या हत्येचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे शाखेला आणि नारायणगाव पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या