24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeइन्स्टाग्राम वादावरून अल्पवयीन मुलाचा खून

इन्स्टाग्राम वादावरून अल्पवयीन मुलाचा खून

एकमत ऑनलाईन

पुणे : इन्स्टाग्रामवरील एका क्षुल्लक कारणामुळे दोन संघांत वाद झाला. त्यामुळे तीन अल्पवयीन मुलांनी एका मुलावर शस्त्राने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वडगाव बुद्रुक या परिसरात ही घटना घडली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टेटसमुळे दोन संघांत वाद झाला. दोन्ही संघांकडून शेअर करण्यात आलेली माहिती एकमेकांना खटकली. या कारणामुळे धारदार शस्त्राने हे वार करण्यात आले आहेत. याप्रकरणी पुणे शहर पोलिसांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

काय आहे प्रकरण?
पुणे शहरातील वडगाव बुद्रुक परिसरात रविवारी सुमारे साडेचार वाजता ही घटना घडली. पीडित एटीएममध्ये पैसे काढायला गेला होता. त्यादरम्यान आरोपी असलेल्या तिघांनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर भरदिवसा आरोपी असलेल्या तीन मुलांनी धारदार शस्त्रांनी अल्पवयीन मुलावर हल्ला केला. या घटनेत पीडित गंभीर जखमी झाला आहे
.
दोन्ही संघ इन्स्टाग्रामवर सक्रिय होते. त्यावर अनेकदा वेगवेगळ्याा गोष्टी शेअर करायचे. पीडित मुलाने शेअर केलेला कन्टेन्ट खटकला. त्यावरून दोघांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला मात्र दोन्ही संघ माघार घ्यायला तयार नव्हते. अखेर त्यांनी सापळा रचून अल्पवयीन मुलाला गाठलं आणि त्याच्यावर हल्ला केला. तीन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे.

वडगाव बुद्रुक येथे भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती स्थानिक लोकांकडून जमा करण्यात येत आहे. त्या महितीवरून पोलिसांनी टीम तयार केली असून हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. ज्यामध्ये तीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या