22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरातील मुस्लिम तरुणीशी लग्न केलेल्या तरुणाचा खून; आरोपीची कबुली

श्रीरामपुरातील मुस्लिम तरुणीशी लग्न केलेल्या तरुणाचा खून; आरोपीची कबुली

एकमत ऑनलाईन

श्रीरामपूर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथे एका तरुणाने मुस्लिम मुलीशी विवाह केल्यामुळे त्याचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर नितेश राणे यांनी लव्ह जिहाद आणि हिंदूंना टार्गेट करण्यात येत असल्याच्या निषेधार्ध श्रीरामपूर शहरात मोर्चा काढला होता. दीपक बर्डे असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव असून त्याची हत्या केल्याची कबुली अटकेत असलेल्या आरोपीने दिली आहे.

दीपकने मुस्लिम मुलीशी विवाह केल्यानंतर त्याचे अपहरण झाले होते. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणात पोलिसांनी सात आरोपींना अटक केली. भाजपचे आमदार नितेश राणे यांच्या एन्ट्रीनंतर या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आणि राणे यांनी अपहरण झालेल्या तरुणाचा शोध लागावा यासाठी श्रीरामपूर येथे मोर्चा काढला होता.

लव्ह जिहाद आणि हिंदू तरुणांना टार्गेट केल्याच्या विरोधात त्यांनी एल्गार पुकारला होता पण अपहरण झालेल्या दीपकचा खून केल्याची कबुली आरोपींनी अटकेत असताना दिली आहे.

श्रीरामपूर येथील आदिवासी समाजातील दीपकचे मुस्लिम मुलीशी प्रेमसंबंध होते. पण मुलीच्या कुटुंबियांचा याला तीव्र विरोध होता. त्यानंतर दोघांनीही घरच्यांच्या विरोधाला न जुमानता लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर मुलीच्या घरच्यांनी दीपकला मारहाण करत मुलीला घरी नेले होते. मुलीच्या कुटुंबियांनी तिला पुण्यात मामाच्या घरी ठेवल्याचे कळाल्यानंतर दीपकने पुणे गाठायचे ठरवले होते. त्यानंतर तो पुण्याला कामाच्या शोधात जातो म्हणून घरातून निघाला होता पण त्याचे अपहरण करण्यात आले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या