पॅरोलवरून सुटलेल्या आरोपीचा येरवड्यात खून

309

पुणे | येरवडात दोन वर्षापूर्वी झालेल्या खुनातील साथीदाराच्या वाढदिवसाच्या दिवशीच येरवडा कारागृहातून सुटलेल्या आरोपीचा अवघ्या काही तासात तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री येरवड्यात घडली. नितीन शिवाजी कसबे याचा खून झाला असून याप्रकरणी येरवडा पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे.

येरवड्यात तीन दिवसात झालेला खूनाचा हा दुसरा गंभीर गुन्हा आहे. येरवडा हा कोरोना आजाराच्या वाढत्या रुग्णसंख्या मुळे कंटेनमेंट असून देखील या परिसरात गंभीर गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढत्या गुन्हेगारीसह खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमुळे येरवडा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Read More  दहशतवादी कसाबची ओळख पटवणा-या साक्षीदाराचे निधन

येरवड्यात दोन वर्षापूर्वी गंड्या उर्फ निहाल लोंढे याचा निर्घुण खून करण्यात आला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त टोळीतील साथीदार नैवेद्य दाखवण्यासाठी जात असताना शादल बाबा चौकाजवळ दहा ते पंधरा हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने केलेल्या मारहाणीत नितीन कसबे याचा मृत्यू झाला. नितीन कसबे याच्यावर मारहाणी सह इतर गुन्हे दाखल होते.

एका गुन्ह्यात सहा महिन्या पूर्वी येरवडा कारागृहात त्याची रवानगी करण्यात आली होती. बुधवारी संध्याकाळी पॅरोलवर सुटका करण्यात आली. टोळीतील साथीदार मयत गंड्या उर्फ निहाल लोंढे याचा वाढदिवस होता. घरी आल्यानंतर मित्रांसोबत नैवेद्य दाखवण्यासाठी जात असताना शादल बाबा चौकाजवळ रेड्डी हॉटेल समोर रामनगर कमानी खाली अज्ञात हल्लेखोरांनी तीक्ष्ण हत्याराने त्याच्यावर वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्याला ससून रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला होता. त्याच्या डोक्यावर, हातावर,पायावर वार करण्यात आले.