23.2 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeमनोरंजनअभिनेता सतीश वज्रची हत्या; मेहुण्यावर संशयाची सुई

अभिनेता सतीश वज्रची हत्या; मेहुण्यावर संशयाची सुई

एकमत ऑनलाईन

मुंबई : कन्नड सिनेसृष्टीतून एक हादरवून टाकणारी माहिती समोर आली आहे. प्रसिद्ध कन्नड अभिनेता सतीश वज्र याची धारदार शस्राने हत्या करण्यात आली. राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात सतीच याचा मृतदेह आढळून आला. महत्त्वाची माहिती म्हणजे तीन महिन्यांपूर्वीच सतीशच्या पत्नीने आत्महत्या केली.

आता सतीशच्या मेहुण्यानं त्याची हत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस यासंदर्भात तपास करत आहे. सतीशच्या हत्येनंतर कन्नड सिनेसृष्टी हादरुन गेली आहे. सिनेसृष्टीतील कलाकारांनी सतीश निधनानं शोक व्यक्त केलाय.

मीडिया रिपोर्टनुसार, सतीश आणि त्याच्या पत्नीनं कुटुंबियांच्या विरोधात जाऊन लग्न केलं होतं. त्यामुळे त्याच्या पत्नीचे कुटुंबिय याने नाराज झाले होते. दोन्ही कुटुंबात वाद होते. असे म्हटले जात आहेत की बहिणीच्या आत्महत्येचा बदला घेण्यासाठी सतीश वज्रच्या हत्या त्याच्या मेहुण्यानं त्याची हत्या केली आहे. ही घटना रविवारी घडली. सतीश कामावरुन घरी आल्यानंतर दोन अज्ञान व्यक्तींनी धारदार शस्त्राने वार केले. सतीश ज्या ठिकाणी राहतो तिथल्या त्याच्या घरमालकाला घराबाहेर रक्त येताना दिसलं. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली.

पोलिसांनी अभिनेत्याच्या फ्लॅटचा दरवाजा तोडून आत जाताच रक्ताच्या थारोळ्यात सतीशचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सतीशचा मृतदेह पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. सतीशच्या हत्येनंतर त्याच्या घराच्या आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचा पोलीस तपास करत आहेत.

कोण आहे सतीश वज्र?
सतीश वज्र हा कन्नड सिनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून तो कर्नाटकच्या मांड्य जिल्ह्यात राहत होतो. सतीशने ‘लागोरी’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर त्याने अनेक सिनेमांमध्ये सहाय्यक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या