देवळालीत धारदार शस्त्राने पं. स. सदस्याची हत्या

    313

    भूम : शेत रस्ता कामाच्या कारणावरील राग व जुगार अड्डयाची माहिती दिल्याच्या संशयावरून भूम तालुक्यातील देवळाली येथील पंचायत समिती सदस्य बाजीराव तांबे यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही खळबळजनक घटना मंगळवारी (दि.२६) रात्री ८:३० वाजता घडली. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात १२ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील एक आरोपी अटक तर ११ जण फरार आहेत.

    याबाबत पोलिस सुत्राकडून मिळालेली माहिती, अशी की देवळाली ते वंजारवाडी शेत रस्त्याच्या कारणावरून यातील आरोपी सोबत बाजीराव कल्याण तांबे यांच्यासोबत ९ मे रोजी भांडण झाले होते. तसेच प्रकाश भागवत गोरे यांच्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड मारून कारवाई केली होती. जुगार अड्डयाची माहिती बाजीराव यांनीच पोलिसांना दिली असा मनत संशय घेत यातील आरोपींनी घेतला होता. याच कारणाने मनात राग धरून आरोपी चंद्रकात रावसाहेब तांबे, सुर्यकांत रावसाहेब तांबे, मधुकर रावसाहेब तांबे, रामनाथ चंद्रकांत तांबे, किरण भाऊसाहेब तांबे, प्रविण लिंगाप्पा शेटे, आभिजित लिंगाप्पा शेटे, श्रीपती भारत विधाते, प्रकाश भगवान गोरे, दिनकर ऊर्फ दिनेश गोरे, फकीरा गोरे, चंद्रकांत दिनानाथ शेटे (सर्व रा. देवळाली) यांनी संगणमत करून व पाळत ठेऊन बाजीराव तांबे हे मोटार सायकलवरून बार्शी येथे जाण्यासाठी निघाले असता ग्रामपंचायत कार्यालयासमोरील रस्त्यावर त्यांची मोटार सायकल आडवून धारदार हत्याराने बाजीराव कल्याण तांबे यांच्या पोटात भोसकुन व हतावर सपासप वार करून हत्या केली.

    Read More  चाचणी क्षमता वाढविली : एकाच वेळी होणार 50 हजार नमुन्यांची चाचणी

    गंभीर जखमी बाजीराव तांबे यांना उपचारासाठी तातडीने बार्शी येथील जगदाळे मामा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मुत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच भूमचे उपविभागीय पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच पोलिसांनी घटना स्थळाचा पंचनामा करून १२ आरोपीविरुद्ध परंडा पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस निरिक्षक इकबाल सय्यद हे करीत आहेत.