23.8 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeराष्ट्रीयगोहत्येच्या संशयातून दोन तरुणांची हत्या

गोहत्येच्या संशयातून दोन तरुणांची हत्या

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्य प्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बरघाट विधानसभेतील सिमरिया गावात दोन आदिवासी तरुणांना बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडले. गोहत्येच्या संशयावरून त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. संपत बत्ती (रा. सागर) व धनसा (रा. सिमरिया) अशी मृतांची नावे आहेत. युवकांच्या हत्येने आदिवासी समाज संतप्त झाला आहे. याचा निषेध नोंदवत आदिवासींनी कुरईचा राष्ट्रीय महामार्ग रोखला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ ते २० लोकांच्या टोळीने या तरुणांना सोमवारी रात्री २.३० वाजताच्या सुमारास बेदम मारहाण केली. कुरई पोलिसांनी २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. तसेच सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दोन ते तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. संपत व धनसा या युवकांच्या घरातून काही मांस जप्त करण्यात आले आहे. त्याचा तपास सुरू आहे. या हल्ल्यात तक्रारदार ब्रजेश बत्ती हेही जखमी झाले.

आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यात स्थलांतरीत मजूर महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रेपल्ले रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास आपल्यावर बलात्कार झाल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जमावाने दिलेल्या माहितीनुसार, संपत व धनसा यांच्यावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ही घटना घडवून आणल्याचा आरोप काँग्रेस आमदार काकोडिया यांनी केला आहे. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी एक कोटीची नुकसान भरपाई आणि नोकरी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या