29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeमहाराष्ट्रमुश्रीफांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

मुश्रीफांच्या मुलांची अटकपूर्व जामिनासाठी धावाधाव

एकमत ऑनलाईन

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील मातब्बर नेते आमदार हसन मुश्रीफ यांच्या तीन मुलांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे. दाखल केलेल्या अर्जावर १६ फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे. राजकीय हेतूने अटक होण्याची शक्यता असल्याचा अटकपूर्व जामीन अर्जात उल्लेख करण्यात आला आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी सातत्याने मुश्रीफांवर कथित गैरव्यवहाराचे आरोप केले आहेत. हसन मुश्रीफ यांच्या नाविद, आबिद आणि साजिद मुश्रीफ यांनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात अर्ज दाखल केला आहे. अर्जातून राजकीय हेतूने अटकेच्या धमक्यांचा वापर केला जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. दरम्यान, ईडीकडून आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर ३५ कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, त्यांचे निकटवर्तीय माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांचे निवासस्थान, सरसेनापती संताजी घोरपडे कारखाना या ठिकाणी ११ जानेवारी रोजी ईडीने छापेमारी केली होती. या तीन ठिकाणांसह मुश्रीफ यांच्या कन्येच्या कोल्हापुरातील सासने मैदान परिसरातील घरावरही छापा टाकण्यात आला. ११ जानेवारी रोजीच ईडीकडून पुण्यातही मुश्रीफ यांच्याशी संबंधित चार ठिकाणी छापे टाकले होते.

त्यामध्ये शिवाजीनगर येथील ई-स्क्वेअरसमोर पेट्रोल पंपामागे इमारतीमधील कार्यालय, हडपसर आणि कोंढवा भागातील अशोका सोसायटीत मुश्रीफ यांचे नातेवाईक, तसेच साऊथ मेन रोड-कोरेगाव पार्कमध्ये राहणारे व्यावसायिक भागीदार यांच्यावर छाप्याची कारवाई करण्यात आली होती.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या