23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमहाराष्ट्रसंयम पाळलाच पाहिजे

संयम पाळलाच पाहिजे

एकमत ऑनलाईन

मुंबई : विरोधी पक्षाच्या आमदारांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाल्याचा दावा आमदार अमोल मिटकरींनी केलेला असताना आमदारांनी विधानभवन परिसरात वागताना संयम बाळगला पाहिजे, अशी अपेक्षा राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी यावरून सत्ताधा-यांना टोला लगावला आहे.

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा आणि विधानपरिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना विधानभवनाच्या बाहेर देखील हेच चित्र दिसून येत आहे. बुधवारी सकाळी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विधानभवनाच्या पाय-यांवर आंदोलन आणि घोषणाबाजीदरम्यान धक्काबुक्की झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या संदर्भात आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

आज सकाळी विधिमंडळाचं कामकाज सुरु होण्याआधी विधानभवनाच्या बाहेरच सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडले. विरोधकांकडून ‘५० खोके एकदम ओके अन् खाऊन खाऊन माजलेत बोके!’ अशा घोषणा दिल्या जात होत्या. मात्र, याचदरम्यान तिथे सत्ताधारी पक्षाचे आमदार विधिमंडळाच्या पाय-यांवर उपस्थित असल्याने विरोधकांनी आमची जागा हायजॅक केल्याचा आरोप केला.

यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आमदार अक्षरश: एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याचे चित्र निर्माण झाले. यावेळी शिंदे गटातील आमदार महेश शिंदे आणि अमोल मिटकरी यांच्यात जोरदार वाद झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या