27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeमराठवाडानगर-आष्टी प्रवासी रेल्वे धावली

नगर-आष्टी प्रवासी रेल्वे धावली

एकमत ऑनलाईन

रेल्वेचे लोकार्पण, रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू

बीड : नगर ते आष्टी ही ६५ किलोमीटर अंतरावरील रेल्वे सेवा प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. त्यामुळे बीड तसेच नगर जिल्ह्यातील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी मार्च २०२३ पर्यंत या रेल्वे मार्गाचे बीडपर्यंतचे काम पूर्ण करण्यात येईल, अशी घोषणा केली.

या लोकार्पण सोहळ््याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, आमदार सुरेश धस, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील उपस्थित होते, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ऑनलाईन हजेरी लावली. परळी-बीड-नगर रेल्वे मार्गावर आज प्रथमच नगर ते आष्टी प्रवासी रेल्वे धावली. आष्टी तालुक्यातील नारायणडोह, लोणी, सोलापूरवाडी, धानोरा, कडा व आष्टी या सहा स्टेशनवर तिकीट विक्री सुरू केली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

लोकार्पण सोहळ््यात पंकजा मुंडे यांनी या रेल्वे मार्गाचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. लोकसभा निवडणुकीवेळी बीडमध्ये असताना त्यांनी या रेल्वेमार्गासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले होते. मोदींनी ते आश्वासन पाळले, असे म्हटले. यावेळी त्यांनी आज दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे स्वप्न पूर्ण झाले, अशा भावना व्यक्त केल्या. ही रेल्वे जेव्हा जेव्हा धडधडेल, तेव्हा तेव्हा बीडकरांच्या मनात गोपीनाथ मुंडेंची आठवण ताजी होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नगर-अष्टी रेल्वे मार्गासाठी २ हजार कोटींचा निधी केंद्राने दिला. ११७५ कोटींचा निधी भाजपचा मुख्यमंत्री असताना देण्यात आला. दर ३ महिन्यांनी मी स्वत: लक्ष घालत होतो. मविआ सरकारने वेळोवेळी निधी देण्यास नकार दिला. शिंदेंसोबत आलेल्या सरकारने मात्र आल्या आल्या कामाला सुरूवात केली, असे म्हटले.

४० रुपये तिकीट
नगर-आष्टी रेल्वेमार्गावर एकूण ६ थांबे असून रेल्वे प्रवाशांसाठी ४० रुपये तिकीट दर आकारला जाणार आहे. रविवार वगळता दररोज ही गाडी धावणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. बीड जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ््याचा बनलेल्या नगर-बीड-परळी रेल्वेमार्गाची एकूण लांबी २६१ किलोमीटर असून नगरपासून आष्टीपर्यंत ६५ किलोमीटर अंतराचे काम पूर्ण झाले आहे.

मार्च २०२३ पर्यंत
रेल्वे बीडपर्यंत धावेल
रावसाहेब दानवे म्हणाले की, आज बीडकरांचे स्वप्न पूर्ण होत आहे. याप्रसंगी गोपीनाथ मुंडेसाहेबांना कधीही विसरु शकत नाही. त्यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. मार्च २०२३ पर्यंत ही रेल्वे बीडपर्यंत धावेल.

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या