22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयऔरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव?

औरंगाबाद विमानतळाला संभाजी महाराजांचे नाव?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : औरंगाबाद विमानतळाला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव देण्यासाठी सेना-भाजपच्या मंत्र्यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली आहे. राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई व केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड या दोघांनी आज शिंदे यांची भेट घेतली असून, दोन्ही पक्षांनी औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ठेवण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे.

राज्यात सध्या शिवसेना पक्षाचा मुख्यमंत्री असल्याने औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर का केले जात नाही? यावरून राज्यात विरोधात बसलेला भाजप नेहमी शिवसेनेवर टीका करत असतो. मात्र आज सेना-भाजपचे दोन्ही नेत्यांनी औरंगाबादच्या विमानतळाच्या नाव बदल्याची मागणी केली आहे. मुंबईच्या बिकेसीत झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीनगर नामांतराची गरज काय? असे म्हटले. तर आज राष्ट्रवादीचे नेते तसेच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी औंरगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही, असे म्हटले आहे.

निवडणुकीच्या तोंडावर होते मागणी
लोकसभा, विधानसभा, स्थानिक संस्थाच्या निवडणुकीचे कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजप आणि शिवसेना औरंगाबादच्या नामंतराचा मुद्दा समोर आणत असतात. गेल्या अनेक वर्षांपासून अनेक राजकीय पक्षांनी संभाजीनगर नावाची मागणी केली असली तरी अद्याप शहाराचे नाव संभाजीनगर कोणीही केलेले नाही. त्यातच आता सुभाष देसाई आणि भागवत कराड यांनी औरंगाबाद विमानतळाला ‘छत्रपती संभाजी महाराज’ असे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या