नांदेड : प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांनी शंभरी पार केली आहे़मंगळवारी रात्री व बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झालेल्या अहवालात १२ जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत़ यामुळे एकुण रूग्णांची संख्या आता ११० वर पोहचली आहे़तर औषध उपचारामुळे बरे झालेल्या ६ जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
नांदेड जिल्ह्यात आतापर्यंत एकुण प्रवासी व प्रत्यक्ष सर्वेक्षणाद्वारे १ लाख २४ हजार ६०० व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून २ हजार ७६१ रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी २ हजार ४५२ स्वॅब तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आलेला असून बुधवारी ३१ नवीन व्यक्तींचे स्वॅब घेण्यात आले व ४६ स्वॅब प्रलंबित असे एकूण ७७ स्वॅबची तपासणी चालू होती़यातील १४ जणांचे अहवाल सांयकाळी सातच्या सुमारास पुन्हा आरोग्य विभागास प्राप्त झाले़यात ४ जण पॉझिटिव्ह निघाले आहेत़तर १० जणांचा अहवाल हा निगेटिव्ह आला आहे़ यामुळे घेतलेल्या एकुण स्वॅब पैकी ११० तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर बुधवारीच पंजाब भवन यात्री निवास येथील ६ रुग्ण औषध उपचारामुळे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
Read More कोरोना : ग्रामीण भागात धाकधुक वाढली
मंगळवारी रात्री उशीरा प्राप्त अहवालातील ८ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ५ रुग्ण पुरुष असून त्यांचे वय वर्षे अनुक्रमे ४, २५, ३४, ५४, ५५ आहे, तर तीन महिला आहेत़ यापैकी ६ रुग्ण कुंभार टेकडी, एक करबला व एक अबचलनगर येथील आहेत. तर बुधवारी सांयकाळी आणखी ४ जण पॉझिटिव्ह रूग्ण आढळले आहेत़ सद्य:स्थितीत त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे. एकुण ११० रुग्णांपैकी ५ रुग्णांचा मृत्यू झाला व ३६ रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे.
६७ रुग्णावर डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय नांदेड, पंजाब भवन , यात्री निवास कोवीड केअर सेंटर व ग्रामीण रुग्णालयात बारड येथील धर्मशाळा कोवीड केअर सेंटरमध्ये औषध उपचार सुरु आहे. सर्व जनतेने अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच मनात कुठल्याही प्रकारची भिती बाळगू नये आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे. तसेच सर्व जनतेने आपल्या मोबाईलवर आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करुन घ्यावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी केले आहे.
बुधवारच्या रुग्णांचा तपशील
आत्तापर्यंत नांदेड शहरातील काही भागात कोरोनाचे रूग्ण आढळले होते़मात्र आता
भोकर, टेंभूर्णी ता. नायगाव येथे (मुखेड येथे उपचार सुरु)कोरोनाने प्रवेश केला आहे़ या ठिकाणी प्रत्येकी १ रूग्ण तर नांदेड शहरातील स्नेहनगर व सांगवीत प्रत्येकी एक रूग्ण आढळला आहे़यामुळे शहरवासियांसह आता ग्रामीण भागातील नागरिकांची चिंता वाढली आहे़