नांदेड :प्रतिनिधी
नांदेड शहरात रविवारी पुन्हा १३ रुग्ण पॉझिटिव्ह रूग्णांची भर पडली आहे़ त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७ वर पोहचली आहे. कोरोना रूग्णांची संख्या शंभरीकडे पोहचत असल्याने नांदेडकर चांगलेच हादरले आहेत़दरम्यान गेल्या दहा दिवसात कोणतीही लक्षणे आढळून न आल्याने आणखी चार बाधितांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोरोना विषाणु संदर्भात रविवार १७ मे रोजी दुपारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर यांनी प्रसिद्धी पत्रकात दिलेल्या माहितीनुसार १४ ते १६ मे या कालावधीत पाठविण्यात आलेल्या ३७४ स्वॅबपैकी सर्व रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून त्यामध्ये नवीन १३ रुग्ण हे पॉझिटिव्ह आढळून आली आहेत. या रुग्णांपैकी ९ रुग्ण प्रवासी असून १ रुग्ण करबला भागातील असून २ रुग्ण हे अबचलनगर भागातील व ग्रामीण रुग्णालय बारड येथील १ रुग्ण आहे.
Read More माजलगावमधील तरुणाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
या रुग्णांपैकी १२ पुरुष असून त्यांचे अनुक्रमे वय वर्षे १३, १४, ते ३७ आणि ४४, ५०, ५९, ७४ असे आहे. तसेच एक स्त्री त्यांचे वय वर्षे ५७ आहे. या रुग्णांवर यात्री निवास एनआरआय भवन व ग्रामीण रुग्णालय बारड येथे औषधोपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्या संपकार्तील व्यक्तींचा शोध घेणे चालू आहे. नांदेड जिल्ह्यात ९७ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी २० रुग्ण हे बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तेरा रूग्ण एकाच दिवशी पॉझिटीव्ह आढळुन आल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्यावतीने बाधित ठिकाणी कडक उपाययोजना केल्या आहेत़