17.5 C
Latur
Friday, December 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयनासाचे ओरियन कॅप्सूल चंद्रावर

नासाचे ओरियन कॅप्सूल चंद्रावर

एकमत ऑनलाईन

मोहीम यशस्वी, चंद्राच्या कक्षेत कापले विक्रमी अंतर
वॉशिंग्टन : नासाची ओरियन कॅप्सूल सोमवारी चंद्रावर पोहोचली. चंद्राच्या मागच्या बाजूने फेरी मारत या कॅप्सूलने चंद्राच्या कक्षेत विक्रमी ८० मैलांचे अर्थात १२८ किमी अंतर कापले. पृथ्वीपासून २३२,००० मैल (३७५,००० किमी) पेक्षा जास्त अंतरावर असलेल्या चंद्राच्या मागून कॅप्सूल बाहेर येईपर्यंत ूस्टनमधील फ्लाइट कंट्रोलर्सना अर्ध्या तासांचे कम्युनिकेशन ब्लॅकआउट पाहायला मिळाले.

५० वर्षांपूर्वी नासाचे अपोलो हे यान चंद्रावर पाठवले होते, त्यातून निल आर्मस्ट्राँगने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले होते. त्यानंतर आता ओरिअन कॅप्सूलने चंद्राला भेट दिल्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या बुधवारपासून सुरू झालेल्या ४.१ अब्ज डॉलर खर्च आलेले हे उड्डाण एक मोठा मैलाचा दगड ठरले आहे. या कॅप्सूलने फ्लोरिडाच्या केनेडी या अवकाश प्रक्षेपण केंद्रातून गेल्या बुधवारी ब्लास्टिंग केले होते. त्यानंतर काही हजार मैलांवर जाऊन ते बंद करण्यात आले होते. त्यावेळी पहाटे घेतलेल्या व्हिडीओत चंद्र खूप मोठा दिसत होता.

या कॅप्सूलसाठी ११ डिसेंबर रोजी पॅसिफिक स्प्लॅशडाउनची योजना आहे. यानंतर नासाचा अंतराळवीर स्पेसएक्सच्या स्टारशिपसह २०२५ मध्ये चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न करेल. पण तोपर्यंत मानवाची ही आणखी एक झेप ऐतिहासिक ठरली आहे.

एक आठवडा राहणार चंद्राच्या कक्षेत
पृथ्वीपासून सुमारे २,५०,००० मैल अर्थात ४,००,००० किमी अंतरावर अपोलो १३ यान सन १९७० मध्ये पोहोचले होते. त्याही पुढे जात आता ही ओरियन कॅप्सूल पृथ्वीपासून सुमारे २,७०,००० मैल अर्थात ४,३३,००० किमीवर अंतरावर पोहोचली आहे. परत पृथ्वीवर परतण्यापूर्वी ही कॅप्सूल चंद्राच्या कक्षेत जवळपास एक आठवडा घालवणार आहे.

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या