21.5 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeमहाराष्ट्र४ ऑगस्टपासून ‘नाशिक-दिल्ली’ विमानसेवा सुरू

४ ऑगस्टपासून ‘नाशिक-दिल्ली’ विमानसेवा सुरू

एकमत ऑनलाईन

नाशिक : कोरोना काळामुळे रखडलेली नाशिक-दिल्ली विमानसेवा येत्या चार ऑगस्टपासून सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांसह व्यापारी, उद्योजकांना देखील हवाई मार्गाने दिल्ली लवकरात लवकर गाठणे शक्य होणार आहे.

नाशिक (ओझर) विमानतळ येथून नाशिक-हैदराबाद-नाशिक, नाशिक-दिल्ली-नाशिक, नाशिक- पाँडेचरी व नाशिक-तिरुपती विमानसेवा स्पाईस जेट या कंपनीच्या माध्यमातून पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. या विमानसेवेमुळे नाशिक आंतरराष्ट्रीय पातळीवर जोडले जाणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नागरी विमान मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे लॉकडाऊनपूर्वी थेट नाशिक-दिल्ली विमानसेवेला चांगला प्रतिसाद असल्याने स्पाईस जेटमार्फत ही सेवा आठवड्याचे सातही दिवस चालू होती.

नाशिक-दिल्ली विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी केंद्रीय नागरी विमान मंत्री यांच्याकडे निवेदन देऊन पाठपुरावा केला होता. त्यानुसार नागरी विमान वाहतूक विभागाने बोईंग ७३७ मॅक्सला परवानगी दिली असून स्पाईस जेटला देखील नाशिक-दिल्ली विमानसेवा दररोज सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या