21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeमहाराष्ट्रनाशिक जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत

नाशिक जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत

एकमत ऑनलाईन

नाशिक : राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस सुरू असताना नाशिक जिल्ह्यात मात्र अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणा-या गंगापूर धरणात केवळ २६ टक्के पाणी साठा शिल्लक असल्याने पाणी कपात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तर जिल्ह्यात पुढच्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
जुलै महिना उजाडून काही दिवस झाले असताना अद्यापही नाशिक शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाची प्रतीक्षा आहे. जूनच्या शेवटच्या आठवड्यात काही तालुक्यांत मुसळधार पाऊस बरसला.

यामध्ये देवळा, चांदवड, मनमाड, सिन्नर, नाशिक शहर, त्र्यंबकेश्वर आदी परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र त्यानंतर पावसाने उघडीप दिली असून रिमझिम पाऊस आहे. जिल्ह्यातील धरणांत केवळ २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्याला जोरदार पावसाची आवश्यकता आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या