23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeराष्ट्रीयराष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कोल्हापूर, नांदेडमध्ये छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून कोल्हापूर, नांदेडमध्ये छापेमारी

एकमत ऑनलाईन

  इसिस संबंधित प्रकरणात मोठी कारवाई

मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने ६ राज्यांमध्ये १३ संशयितांच्या घरांची झाडाझडती घेतली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळ आणि रायसेन जिल्हे, गुजरातमधील भरूच, सुरत, नवसारी आणि अहमदाबाद जिल्हे,बिहारमधील अररिया जिल्हा, कर्नाटकातील भटकळ आणि तुमकूर शहर, महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नांदेड  आणि उत्तर प्रदेशातील देवबंद जिल्ह्यामध्ये इसिसच्या कारवायांशी संबंधित छापेमारी करण्यात आली.

 

राष्ट्रीय तपास यंत्रणांनी आज महाराष्ट्रातल्या कोल्हापूर आणि नांदेडसह देशातल्या १३ ठिकाणी छापे टाकले आहेत. सहा राज्यांतल्या या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, साहित्य जप्त करण्यात आले आहे. इसिस मॉड्युल प्रकरणाच्या तपासात ६ राज्यांमध्ये अनेक ठिकाणी शोध घेतला जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या