22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडाशस्त्रांच्या तस्करीप्रकरणी राष्ट्रीय कबड्डीपटूला अटक

शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी राष्ट्रीय कबड्डीपटूला अटक

एकमत ऑनलाईन

गुना : मध्य प्रदेशच्या गुनामध्ये शस्त्रांच्या तस्करीप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये राष्ट्रीय स्तरावर कबड्डी खेळणा-या एका खेळाडूचा देखील समावेश आहे. हे सर्वजण या शस्त्रांची खेप शिवपुरी येथील त्यांच्या क्लायंटला पाठवण्याच्या तयारीत होते. याचवेळी पोलिसांनी कारवाई करत त्यांच्या ताब्यातून शस्त्रे जप्त केली. घटनास्थळी चार जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या ताब्यातून पाच भरलेली पिस्तूल आणि तीन मॅगझीन जप्त करण्यात आली आहेत.

चार आरोपींपैकी एक राष्ट्रीय कबड्डीपटूचे नाव रिंकू जाट असून, तो हरियाणाचा रहिवासी आहे. रिंकू व्यावसायिक कबड्डी लीगमध्ये खेळतो, असे पोलिसांनी सांगितले. तसेच तो मौजमजा करायला पैसे कमवण्यासाठी अवैध शस्त्र विकण्याचा व्यापार करतोय, अशी माहिती पोलिसांनी दिली. रामपाल जाट, अमीर खान आणि महेंद्र रावत अशी इतर तीन आरोपींची नावे आहेत. रिंकू आणि रामपाल हे हरियाणातील सोनीपतचे रहिवासी आहेत, तर अमीर खान आणि महेंद्र रावत हे मध्य प्रदेशातील शिवपुरीचे रहिवासी आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या