25.2 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeराष्ट्रीयबँकांचा देशव्यापी संप मागे

बँकांचा देशव्यापी संप मागे

एकमत ऑनलाईन

बँक एम्प्लॉईज असोसिएशनची घोषणा, शनिवारी सुरू राहणार बँका
नवी दिल्ली : ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून शनिवारी देशव्यापी बँक संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे उद्या देशभरातील बँका सुरु राहणार आहेत आणि त्यापुढेही कामकाजाच्या दिवशी बँका सुरु राहतील. कर्मचा-यांच्या मागील ५ वर्षांपासून लावून धरलेल्या मागण्यांवर तोडगा काढण्यास इंडियन बँक असोसिएशन आणि आर्थिक सेवा विभागाकडून होकार देण्यात आला आहे. मुख्य कामगार आयुक्तांसोबत (केंद्र) बँक संघटनांच्या झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

आऊटसोर्सिंग आणि अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रान्सफर्स बँकिंग इंडस्ट्रीजच्या मान्यतेविना होणार नाही. सोबतच बँकांकडून कामगार कायद्यांची अंमलबजावणी सक्तीने करणार, कामगार कायद्यांचे पालन होत नसल्याचा बँकिंग संघटनांचा आरोप होता. काही बँकांच्या कर्मचा-यांसोबत असलेल्या वादावरदेखील लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी केंद्रीय कामगार आयुक्तांनी पुढाकार दाखवला आहे. या चर्चेनंतर अखेर ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनकडून उद्यापासून पुकारण्यात आलेला संप मागे घेतला आहे.

ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने कॅथॉलिक सीरियन बँक आणि डीबीएस बँकेच्या कर्मचा-यांना ११ व्या द्विपक्षीय वेतन सुधारणा नाकारण्यासह कायमस्वरुपी नोक-यांचे आऊटसोर्सिंग (कॅश मूव्हमेंट जॉब आणि हाऊसकीपिंग जॉब) आणि काही बँकांमधील नोकरीच्या सुरक्षिततेला धोका यासह अनेक मुद्यांच्या निषेधार्थ १९ नोव्हेंबर रोजी देशव्यापी संपाची हाक दिली होती.

तोडगा काढण्याचे सरकारचे निर्देश
केंद्र सरकारने कइअ आणि बँक युनियनला 16 नोव्हेंबर रोजी चर्चा सुरु करुन संप टाळण्यासाठी तोडगा काढण्याचे निर्देश दिले होते. दिल्लीत सीएलसी रामिस थिरु यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सलोखा बैठकीत हे निर्देश देण्यात आले होते. परंतु कोणताही तोडगा न निघाल्याने उद्या बँकांचा देशव्यापी संप होणार असल्याचं संघटनेनं सांगितलं होतं. त्यानंतर आज पुन्हा या मागण्यांबाबत चर्चा झाली आणि ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (अकइएअ) ने संप मागे घेण्याची घोषणा केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या