23.6 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeनिसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

निसर्ग परीक्षा घेतोय, ताकदीने सामना करु : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

एकमत ऑनलाईन

निसर्ग चक्रीवादळ; पुढचे दोन दिवस ‘पुनःश्च हरिओम’ नको : चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लष्कर, वायू आणि जलसेना तयार

मुंबई | हवामान खात्याकडून निसर्ग चक्रीवादळाचा धोका पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी किनारपट्टीजवळील वास्तव्यास असलेल्या नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच या चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी लष्कर, वायू आणि जलसेना तयार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. आज जनतेशी संवाद साधतांना मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी आपण भेटलो होतो.

महाराष्ट्राच्या सीमेवर घोंगावणारे चक्रीवादळ आपल्या उंबरठ्यावर आलं आहे. अलिबाग येथे वादळ धडकण्याची शक्यता आहे. हे वादळ कदाचिक मोठं असू शकतं. 100 ते 115 वेगाने वारे वाहतील. प्रार्थना हीच आहे की हे वादळ हवेत नाहीसं व्हावं. जे काही दिसतंय त्यावर हे वादळ उद्या दुपारपर्यंत किनाऱ्यावर धडकेल. उद्या किनारपट्टी भागात हे वादळ परिणाम करेल. आपण सज्ज आहोत. एनडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात केल्या असल्याचं म्हंटल आहे.

Read More  धुवाधार पावसामुळे मनपाचे पितळ उघडे

तसेच या पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मला फोन आला, राज्यासोबत केंद्र सरकार असल्याचं त्यांनी बोलतांना म्हंटल आहे. पुढचे 3 आणि 4 हे दोनही दिवस महत्वाचे आहे. या दोन दिवसात कुणीही घराबाहेर पडून नका. असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हंटल आहे. एकीकडे संपुर्ण देश कोरोना व्हायरसचा सामना करत असतांना आता मुंबईवर चक्रीवादळाचं नवं संकट आलं आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, बुधवारी हे निसर्ग चक्रीवादळ मुंबईच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. दरम्यान, या वादळाचं चक्रीवादळात रुपांतर झाली असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. चक्रीवादळाचं निसर्गाचे वारे ताशी सुमारे 100 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. बीएमसी आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी मंत्रालयातील राज्य सरकारी अधिकाऱ्यांशी भेट घेऊन या परिस्थितीला सामोरं जाण्याची तयारी केली आहे. याबाबत आयुक्तांनी नियमावली जारी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या